मुंबई

साहित्य विक्रेते तसेच लोक कलावंतांवर महासंकट; महापरिनिर्वाण दिन रद्द झाल्याचा परिणाम

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 26 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर उसळतो. मात्र कोरोना संकटामुळे चैत्यभुमिच्या इतिहासात पहिल्यांदाच इथे होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. याचा सर्वाधिक फटका आंबेडकरी साहीत्य विक्रेते तसेच लोककलावंताच्या व्यवसायाला बसला असून त्यांचा रोजगारही बुडाला आहे. आंबेडकरी साहीत्य तसेच लोककलावंतांना 100 कोटी रूपयांचा फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. 

महापरीनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो भीम अनुयायांनी चैत्यभूमीला भेट देतात. दरवर्षी भीम अनुयायी मोठ्या प्रमाणावर बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकरी साहित्य खरेदी करतात. त्यासाठी पालिका चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात पुस्तक विक्रीचे 300 पेक्षा अधिक स्टॉल्स उपलब्ध करून देते. तसेच पदपथांवर साधारणता 700 पेक्षा अधिक पुस्तक विक्रीची दुकानं थाटण्यात येतात. त्याशिवाय धातूच्या मूर्ती, ऑडीओ, व्हिडीओ कॅसेटची मोठी विक्री चैत्यभूमीवर होते. चार दिवसात  1 कोटीपेक्षा अधिक पुस्तकं खरेदी होत असल्याचे सांगत 50 कोटी रुपयांचं आंबेडकरी साहित्याची विक्री होते.

महापरिनिर्वाण दिनाच्या साधारणता 15 दिवस आधी आम्ही नविन पुस्तकं मागवतो. एक साहीत्य विक्रेता साधारणतः 2 ते 5 लाख रूपयांचे साहीत्य मागवतो. त्यातील विक्रितून एक दुकानदार साधारणता 2 ते अडीच लाख रूपये कमवत होता. मात्र यावेळी कोरोना साथीचे संकट लक्षात घेऊन आम्ही पुस्तकांची मागणी केली नसल्याचे  बुद्ध, फुले, शाहू, कबीर, आंडेकर साहित्य प्रसारक मंडळाचे प्रमुख राजू उके यांनी सांगितले. धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिन तसेच भिम जयंती दरम्यान आमचा 90 टक्के व्यवसाय होतो. यावेळी मात्र आम्हाला दुकाने बंद ठेवावी लागणार असल्याने मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे ही उके पुढे म्हणाले.

महापरिनिर्वाण दिनाच्या दोन दिवस आधीपासून अनुयायी चैत्यभुमिवर दाखल होतात. इतर वेळी देखील अनुयायी चैत्यभुमिला भेट देत असतात. प्रत्येक अनुयायी 400 ते 500 रूपयांची पुस्तकं विकत घेतो. यावेळी मात्र लॉकडाउनमुळे इथे येणा-या अनुयायांची संख्या फारच कमी झाली आहे. सरकारने यावर्षी कार्यक्रमच रद्द केल्याने आम्ही दुकाने देखील बंदच ठेवणार आहोत. त्यामुळे दुकादारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचेही उके म्हणाले. मात्र जागतिक महामारी असल्याने सरकार तसेच बौद्ध महासभेने घेतलेला निर्णय लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असल्याचे ही ते पुढे म्हणाले. 

महापरिनिर्वाण दिनी होणारा कार्यक्रम रद्द झाल्याने लोककलावंतांवर देखील उपासमारीची पाळी आल्याचे लोक कलावंत सांस्कृतिक मंचचे अद्यक्ष गायक विष्णु शिंदे यांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त सतत दोन दिवस भिम गीते तसेच चळवळीच्या गितांचा कार्यक्रम व्हायचा. शेकडो कलाकार त्यात सहभागी व्हायचे. अनेक नविन ऑडीओ तसेच व्हिडीओ अल्बम यावेळी प्रकाशित व्हायचे. यावेळी हे रद्द झाल्याने त्याचा मोठा फटका लोककलावंतांना बसला असल्याचे ही शिंदे यांनी सांगितले. या दरम्यान आमचे आकाशवाणी तसेच दूरदर्शनवर देखील कार्यक्रम व्हायचे, ते देखील रद्द झाल्याचे ते म्हणाले. 

( संपादन - सुमित बागुल )

amid corona folk artist and literature salters to lose more than 100 crore on this mahaparinirvan din

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT