cyber crime Sakal
मुंबई

Mumbai Crime: गुजरातच्या व्यक्तीला गंडा घालून दागिन्यांची खरेदी, वाचा मुंबईतला सायबर क्राईमचा अजब प्रकार!

Latest Crime News : पांडे यांनी तीन तासांच्या आत फसवणुकीची बाब कळविल्याने सायबर पोलिसांनी ती बँकेच्या नोडल अधिकाऱ्याकरवी रोखली आणि पांडे यांच्या खात्यात पुन्हा वळती केली

सकाळ वृत्तसेवा

Latest Crime News: सायबर फसवणूक झालेल्या गुजरातच्या व्यक्तीने वेळेत केलेल्या तक्रारीमुळे त्याचे पैसे पोलिसांनी सुरक्षित केले. मात्र मधल्या काही मिनिटांत या पैशांच्या सहाय्याने मुंबईतील सराफा व्यवसायिकाला मात्र चूना लागला. सायबर भामट्यांची फसवणुकीची ही नवी पद्धत विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याद्वारे उजेडात आले आहे.

अंधेरीतील एका सराफा दुकानात सकाळी दागिने पसंत केले आणि संध्याकाळी विकत घेतले. या व्यक्तीने जगदीश पटेल या भावाच्या नावे बील बनविण्यास सांगितले. पुरव्यादाखल त्याने जगदीशचे आधार कार्ड दाखविले.

या व्यक्तीने सराफा दुकानाच्या नावे असलेल्या बँक खात्यावर दागिन्यांचे साडेतीन लाख रुपये भरले. दागिने घेऊन ही व्यक्ती निघून गेल्यावर काही तासांनी या बँक खात्यात जमा झालेले पैसे आपोआप अन्य खात्यात वळते झाले.

हे समजताच सराफा व्यापाऱ्याने बँकेत धाव घेतली. तेव्हा ही रक्कम गुजरातच्या विनय पांडे या व्यक्तीच्या सायबर फसवणूक करून ती सराफा दुकानाच्या खात्यात वळती करून दागिने खरेदी करण्यात आले होते.

पांडे यांनी तीन तासांच्या आत फसवणुकीची बाब कळविल्याने सायबर पोलिसांनी ती बँकेच्या नोडल अधिकाऱ्याकरवी रोखली आणि पांडे यांच्या खात्यात पुन्हा वळती केली, अशी माहिती बँकेने व्यापाऱ्याला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT