Rutuja Latke Andheri By polls Sakal
मुंबई

Andheri By-poll : माघार घेण्यासाठी मला धमक्या देतायत; अपक्ष उमेदवाराचा ठाकरे गटावर गंभीर आरोप

या प्रकरणी या अपक्ष उमेदवाराने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

अंधेरी पोटनिवडणुकीचा विषय दिवसेंदिवस रंगत चालला आहे. रोज काही ना काही नवे मुद्दे समोर येत असून त्यामुळे या निवडणुकीविषयीची उत्सुकता आणखी ताणली जात आहे. आताही एक नवं प्रकरण समोर आलंय. या निवडणुकीत ठाकरे गटाकडून अपक्ष उमेदवारावर माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकरणी अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहीत आपल्याला धमक्या येत असल्याचं सांगितलं आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात, "मी निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरलं होतं, मी अपक्ष उमेदवार आहे, छाननीअंती माझा अर्ज वैध असून माझ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांच्या प्रतिनिधींनी मला भेटून माझ्यावर माघार घेण्यासाठी दबाव टाकला आहे. मी सध्या चिंताग्रस्त असून दडपणाखाली वावरत आहे. यांनी मला धमकी दिली आहे की माघार घेतली नाही तर तुला आणि तुझ्या परिवाराला आम्ही बघून घेऊ."

या पत्रात आपण चिंताग्रस्त असून तणावात आहे, असं मिलिंद कांबळे यांनी म्हटलं आहे. याशिवाय माझे आणि माझ्या परिवाराचे काही बरे वाईट झाल्यास या अर्जास उल्लेख असलेले सर्वजण त्याला जबाबदार असतील, असंही कांबळे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला त्यांनी हे पत्र दिलं आहे. आता आयोग या पत्राची दखल घेऊन काय कारवाई करतं हे पुढील काळात पाहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनी मेजर ध्यानचंद यांना वाहिली आदरांजली

कमिशन हवंय तुम्हाला? आतापर्यंत किती खाल्लं? न्यायमूर्तींनी IAS अधिकाऱ्याला झापलं, वकीलही शांत बसले; पाहा VIDEO

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचं वादळ मुंबईत धडकलं; मनोज जरांगेंची तोफ आझाद मैदानात धडाडणार

Weather Update : गोवा, कोकण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय; मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत 'हवामान'ची स्थिती कशी?

Mahabaleshwar News:'वेण्णा लेकनजीक आढळले अजगर'; भक्ष्याच्या शोधार्थ वावर; वन विभाग, सह्याद्री प्रोटेक्टर्समार्फत रेस्क्यू

SCROLL FOR NEXT