anil deshmukh 
मुंबई

डिस्चार्ज, पत्रकार परिषद आणि क्वारंटाइन; अनिल देशमुख यांनी दिलं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर आता राज्यातील राजकारणात आणखी घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची बाजू घेतल्यानंतर तारखांची चर्चा सुरु आहे. शरद पवार यांनी अनिल देशमुख हे कोरोनामुळे 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत क्वारंटाइन होते असं सांगितलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांचा 15 फेब्रुवारीचा पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअर केला होता.  आता यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं असून कोरोना झाल्यानंतर रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळाला, पत्रकार परिषद कधी घेतली आणि क्वारंटाइन किती दिवस होतो याची माहिती दिली आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, कोरोनामुळे मी रुग्णालयात होतो. रुग्णालयातून मला 15 तारखेला डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर रुग्णालयाबाहेर बाहेर पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हापासून 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत मी क्वारंटाइन होतो असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या अॅलेक्सिस रुग्णालयात पत्रकार परिषद घेतली होती.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्याविरोधात परबीर सिंग यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. माझे आरोप खोटे असतील तर देशमुखांच्या घरचे CCTV तपासा असंही परमबीर सिंग यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! एकनाथ शिंदेंचे कौतुक, उद्धव ठाकरे गटाला धक्का; कारण सांगत ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका

विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून मोदींची संवेदनशीलता; NEET सुरू होईपर्यंत 45 मिनिटे विमानतळावर केली प्रतीक्षा

Maharashtra Monsoon: मान्सून ज्याच्यामुळे रखडला ते सोमाली जेट आहे काय?

Groundwater Protection: पुणे जिल्ह्यात धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण व बेकायदेशीर बोअरवेलवर नियंत्रणाची मागणी; भूजल संवर्धनासाठी ठोस उपाययोजनांचा आग्रह

माढा कसबा पेठेतील ऐतिहासिक विठ्ठल Madha Vitthal Temple restoration: मंदिराला प्राचीन रूप परतवण्यासाठी सॅंड ब्लास्टिंगद्वारे रंग काढण्याचे काम; भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद

SCROLL FOR NEXT