मुंबई

"नारायण राणे वैफल्यग्रस्त, पाच वर्ष टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही काम नाही"; अनिल परबांचे राणेंवर शरसंधान

सुमित बागुल

मुंबई : शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी भाजपचे नेते नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. गेल्या काही काळात नारायण राणे यांनी वारंवार शिवसेनेवर टीका केलीये, शिवसेनेवर निशाणा साधलाय. यावर महाविकास आघाडी नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी नारायण राणे यांना खडेबोल सुनावले आहेत. 

महाविकास आघाडी सरकारने गेल्या एका वर्षभरात चांगलं काम केलं आहे. त्यामुळे आम्हाला नारायण राणे यांच्याकडून आमच्या कामाचे प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. नारायण राणे वैफल्यग्रस्त झालेले आहेत. महाविकास आघाडीमुळे विरोधीपक्षातील नेते निराश झाले आहेत. त्यामुळे विरोधकांना टीका करण्याशिवाय काहीही काम उरलेलं नाही, असंही त्यांनी सांगितलंय.  

यावेळी बोलताना अनिल परब यांनी शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि मेट्रो कारशेडबाबत देखील वक्तव्य केलं आहे. सरकारने सुरवातीलाच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. त्यांनतर मेट्रोबाबत देखील घेतलेला निर्णय विचार आणि योग्य अभ्यास करूनच घेतलेला आहे, त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही असंही अनिल परब म्हणालेत. 

सरकार मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत जोरकसपणे मांडत आहे. आरक्षण टिकावे म्हणून सरकारकडून चर्चा सुरु आहे. दरम्यान कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल असेही ऍडव्होकेट अनिल परब म्हणालेत. 

anil parab targets narayan rane says opposition have nothing to say except criticism

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

Latest Marathi News Updates : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

SCROLL FOR NEXT