मुंबई

पालिकेच्या हेल्पलाईनवर वाढले 'चिंतेचे कॉल'! कोव्हिड महामारीमुळे भीतीमध्ये भर

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा



मुंबई : जगभरात कोरोनाच्या महामारीचा विळखा अधिकच घट्ट झाला आहे. हा आजार होण्याच्या भीतीने किंवा त्याचा जास्त विचार केल्याने लोकांच्या मनावर परिणाम होत आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी हेल्पलाईन क्रमांकांवर येणारे कॉल वाढले आहेत. मागील दोन महिन्यांत मुंबई महापालिकेच्या 'हितगूज' हेल्पलाईनवर 2000 हून अधिक कॉल आले. त्याआधी 24131212 या हेल्पलाईन क्रमांकावर दररोज 20 हून अधिक कॉल येत होते. मार्चमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून ही संख्या दिवसाला 35 वर पोहोचली असून, कोरोनाशी संबंधित चिंतेचे किमान 10 कॉल दररोज येतात, असे सांगण्यात आले. 

कोरोना विषाणूसंसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी हालचालींवर निर्बंध आल्यामुळे लोकांमध्ये चिडचिडेपणा आणि रागाचे प्रमाण वाढत आहे. कोरोना महामारीमुळे मानसिक ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महापालिकेने 1800120820050 या टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांकावर दोन महिन्यांत 45 हजार कॉल नोंदवले आहेत. एप्रिलमध्ये राज्य सरकार आणि महापालिका यांच्या सहकार्याने आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या पुढाकाराने 'एमपॉवर वन ऑन वन' सुरू केले. तेथेही कोरोना, सुरक्षितता, घराबाहेर पडणे, नोकरी, प्रवास, कामाच्या ठिकाणीचे वातावरण याबाबत चिंता व्यक्त करणारे कॉल मोठ्या प्रमाणात आले. 

कुटुंब आणि मित्राबाबतच्या प्रश्नांचे प्रमाणही लक्षणीय होते. कॉल करणाऱ्यांपैकी 52 टक्के जणांनी चिंताग्रस्त असल्याचे सांगितले. 22 टक्के व्यक्तींनी विलगीकरणाशी संबंधित समस्या मांडल्या आणि 11 टक्के लोकांमध्ये नैराश्याची लक्षणे दिसली. 5 टक्के नागरिकांनी झोपेसंबंधी तक्रारी केल्या, तर 4 टक्के लोकांनी मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. या दोन्ही हेल्पलाईनवर आलेले सर्वाधिक कॉल 25 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तींचे होते.

औषधांवर निर्बंध
मानसोपचारतज्ज्ञांनी लिहून दिलेली औषधे अनेकदा नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्याखालील आणि शेड्यूल-10 औषधांच्या श्रेणीत येतात. त्यामुळे अनेक औषध दुकाने डिजिटल प्रिस्क्रिप्शनवरून अशी औषधे देत नाहीत. औषधे न मिळाल्यामुळे रुग्णांमध्ये चिंता, औदासीन्य आणि नैराश्याचे प्रमाण वाढल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितले. बर्‍याचदा दुरुपयोग होत असल्यामुळे ही औषधे लिहून देण्यावर अनेक निर्बंध आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.


हेल्पलाईनवरील कॉल

23 मार्च ते 31मे : 925
1 ते 17 जून : 363 
कोव्हिडशी संबंधित : 50 ते 60 टक्के

साधारण कॉलपेक्षा कोव्हिडबाबत चिंता, समस्या सांगणाऱ्या कॉलमध्ये 50 ते 60 टक्के वाढ झाली आहे. वाढती बेरोजगारी, व्यवसायाचे नुकसान, कोरोनाची भीती यामुळे मानसिक आजार वाढले आहेत. संसर्ग होण्याच्या भीतीमुळे नागरिक कार्यालयात जाण्यासही कचरत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना सकारात्मक गोष्टी सांगितल्या जातात. 
- डॉ. अमेय आंगणे, सहायक प्राध्यापक, मनोविकृती विभाग, केईएम रुग्णालय

लोक घरी बसून निराश होत आहेत. सोशल मीडियावरील नकारात्मक आणि खोट्या बातम्यांमुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. अनेक तरुण घरात राग व्यक्त करतात; त्यामुळे तणाव वाढतो. 
- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचार तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : नागपुरात रक्ताचं नातं रक्ताळलं! भावानं 30 वर्षीय सख्ख्या बहिणीचा तलवारीनं चिरला गळा; मुलीच्या बचावासाठी गेलेली आईही गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

Satara News: पाचगणीत ‘ईडी’ची कारवाई! मनी लाँडरिंगप्रकरणी जुनैद मेमन यांच्या तीन मिळकती ताब्यात; गुप्तता अन् माहिती देण्यास टाळाटाळ!

Bribe Land Record Change : सातबाऱ्यावर फेरफार करण्यासाठी १० हजारांची लाच, महिला ग्राम महसूल अधिकारीचा भ्रष्ट कारभार उघड, दापोलीतील घटना

राज्यातील १२ झेडपी, १२५ पंचायत समितीच्या अध्यक्ष-सभापती निवडीचा 'मुहूर्त' ठरला; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

SCROLL FOR NEXT