30 एप्रिलनंतरही कोरोनाबाधितांची संख्या न घटल्यास मुंबईत लष्कराची मदत 
मुंबई

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या न घटल्यास, होणार 'हा' निर्णय?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशात कोरोनाच्या संसर्गाने चांगलेच हातपाय पसरवले असून त्यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरात आहेत. दिवसेंदिवस मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनापुढे आव्हान उभे राहिले आहे. शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरावर लक्ष ठेवून असलेल्या पोलिसांच्या मदतीला लष्कराच्या दक्षिण कमांडमधून दोन अत्याधुनिक ड्रोन दाखल झाले आहेत. 

कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागातील चिंचोळ्या भागात पोलिसांकडून ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या ताफ्यात केवळ सहा ड्रोन आहेत; मात्र हे सहा ड्रोन पुरेसे नाहीत. कोरोनामुळे शहरातील 200 हून अधिक ठिकाणे बंद केली आहेत. या परिसरात वेळोवेळी ड्रोनच्या साह्याने लाऊडस्पिकवरून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येते. त्याशिवाय दोन ड्रोनच्या साह्याने अतिसंवेदनशील भागातील परिस्थितीचा अंदाज घेतला जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी नागरिक सर्रासपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. एवढेच नाही तर पोलिसांवर हल्ले देखील करत आहेत. त्यामुळे सहा ड्रोनच्या मदतीने संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवणे अवघड जात आहे. 

दरम्यान, भारतीय लष्कराला राज्यातील मुंबई, पुणे शहरातील पोलिसांना मदत करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयामार्फत मिळाले होते. त्यानुसार लष्कराच्या दक्षिण कमांडने मुंबई पोलिसांना दोन ड्रोन दिले असून ते चालवण्यासाठी लष्कराचे चार जवान नियुक्त करण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईतील आर्मी कार्यालयातून हे दोन ड्रोन संपूर्ण मुंबईवर पहारा ठेवणार आहेत. मुंबईतील हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी हे ड्रोन गस्त घालणार आहेत. 

ही बातमी वाचली का? सरकारकडून मासेमारीला परवानगी; मात्र, मासे विकणार कुठे?​

अन्यथा मुंबईत लष्कराची मदत? 
30 एप्रिलनंतरही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी न झाल्यास लष्कराकडून मुंबई पोलिसांना मोठ्या प्रमाणात मदत केली जाणार असल्याचे संकेत लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहेत. सध्या मुंबई आणि पुणे येथे प्राथमिक स्वरूपाची मदत देण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाकडून मिळाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Ganpati Decoration 2026: कागदी कमळ, केळीची पाने अन् कापसाचे ढग; यंदा गणपती सजावटीसाठी ट्राय करा १० भन्नाट अन् सोप्या आयडिया!

Pune Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

SCROLL FOR NEXT