मुंबई

थकीत देयके लवकरच अदा होतील, हाफकिन व्यवस्थापकीय संचालकांचे औषध वितरकांना आश्वासन

भाग्यश्री भुवड

मुंबई, 21 : राज्यातील 100 पेक्षा अधिक औषध वितरकांची वर्षभरापासूनची तब्बल 103 कोटी रुपयांची देयके राज्य सरकारकडून थकवण्यात आली आहेत. त्यामुळे राज्य सरकारला औषध पुरवठा न करण्याबरोबरच निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय औषध वितरकांनी घेतला होता. औषध वितरकांच्या आंदोलनाचा सोमवारी सातवा दिवस होता. मात्र येत्या आठवड्यात प्रशासनाकडून थकीत देयके अदा करण्यात येतील असे आश्वासन हाफकिन व्यवस्थापकीय संचालक यांनी दिले असल्याची माहिती औषध वितरक संघटनेच्या अभय पांडे यांनी दिली.

रविवारपर्यंत प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने औषध वितरकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान सोमवारी हाफकिन व्यवस्थापकीय संचालक राठोड यांच्याशी बोलणे होऊन देयके अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती अभय पांडे यांनी दिली. तत्पूर्वी जूनपासून काढण्यात आलेल्या तब्बल 83 निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय औषध वितरकांनी घेतला.

त्यासंदर्भातील पत्र ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनकडून हाफकिन बायोफार्मास्युटीकलला पाठवले होते. राज्यातील 100 पेक्षा अधिक औषध वितरकांची वर्षभरापासूनची तब्बल 103 कोटी रुपयांची देयके राज्य सरकारकडून थकवण्यात आली आहेत. त्यामुळे राज्य सरकारला औषध पुरवठा न करण्याबरोबरच निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय औषध वितरकांनी घेतला होता. त्यानुसार जूनपासून काढण्यात आलेल्या तब्बल 83 निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय औषध वितरकांनी घेतला आहे. त्यासंदर्भातील पत्र ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनकडून हाफकिन बायो फार्मास्युटीकलला पाठवले आहे. 

राज्याच्या औषध खरेदी कक्षाकडून 2019-20 मध्ये औषध वितरकांकडून कोट्यवधी रुपयांची औषधे मागवण्यात आली होती. मात्र यातील 103 कोटी रुपयांची देयके खरेदी कक्षाकडून थकवण्यात आली आहेत. ही देयके मिळावीत यासाठी वर्षभरापासून औषध वितरकांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र त्याकडे खरेदी कक्षाकडून दुर्लक्ष करून औषध वितरकांची देयके मंजूर करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे औषध वितरकांनी 14 डिसेंबरपासून औषध पुरवठा बंद केला आहे. त्यानंतरही खरेदी कक्षाकडून देयके देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल होत नसल्याने औषध वितरकांनी निविदा प्रक्रियेमध्येही सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 26 जूनपासून काढण्यात आलेल्या तब्बल 83 निविदांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. बहिष्कार टाकलेल्या निविदांची अंतिम मुदत ही 23 डिसेंबरपासून 6 जानेवारीपर्यंत आहे. डिसेंबरपूर्वी काढलेल्या निविदांमध्ये काही तांत्रिक अडचणी किंवा काही आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासंदर्भात खरेदी कक्षाकडून वितरकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या पूर्ततेच्या प्रक्रियेतही वितरकांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी हाफकिन व्यवस्थापकीय संचालक यांनी देयके अदा करण्याचे आश्वासन दिले असले तरीही 
जोपर्यंत आमची देयके मंजूर होत नाहीत, तोपर्यंत आम्ही औषध पुरवठा न करता आंदोलन सुरूच ठेवणार आहोत असं अभय पांडे (अध्यक्ष, ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन) म्हणालेत. 

( संपादन - सुमित बागुल )

arrears will be paid soon Halfkin managing director assures medicine distributors

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT