मुंबई

अंबानींच्या घराबाहेर त्या रात्री नेमकं काय घडलं? NIAनं सचिन वाझेंना कुर्ता घालून लावलं चालायला

सकाळन्यूजनेटवर्क

Sachin Vaze news : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर  स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरु आहे. काल, शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर वाझे यांना आणले होते. त्यांना कुर्ता घालून तीन वेळा चालायला लावलं. मुकेश अंबानींचं निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर या घटनेचे एनआयएकडून  नाट्य रुपांतर करत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती 'एनडीटीव्ही'ने सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके प्रकरणात जी गाडी दिसते त्या गाडीमागे पीपीई किट घालून जी व्यक्ती आहे, ती सचिन वाझे असावी, असा 'एनआयए'ला संशय आहे. या प्रकरणातील घटनाक्रम समजून घेण्यासाठी 'एनआयए'ने शुक्रवारी रात्री अंबानींच्या घराबाहेर नाट्यरुपांतर केलं. यामध्ये आधी सचिन वाझेंना शर्ट आणि पँटमध्ये चालायला सांगण्यात आलं. नंतर त्यांना कुर्ता आणि डोक्याला रुमाल बांधून चालायला लावण्यात आलं. कारण त्या गाडीच्या मागे जी व्यक्ती दिसते, त्या व्यक्तीनं सैल कुर्ता घातलेला होता. 'एनआयए'च्या म्हणण्यानुसार ती व्यक्ती सचिन वाझे आहेत.

सचिन वाझे प्रकरणाची शुक्रावारी कोर्टात सुनावणी झाली, यावेळी 'एनआयए'ने आपले लेखी उत्तर सादर केले. आता याप्रकरणी ३० मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

अंबानी यांच्या बंगल्याबाहेर 25 फेब्रुवारी रोजी संशयास्पद कार सापडली होती. तर, हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंबईच्या खाडीत सापडला होता. या प्रकरणात एनआयएने स्कॉर्पिओसह इनोव्हा, दोन मर्सिडिज आणि एक टोयोटा लँड क्रूझर प्रॅडो अशा पाच गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात एकेकाळचे एन्काउंट स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्यावर संशयाची सूई असून, एनआयएकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मनसूख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमागे सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT