मुंबई

'अर्सेनिक अल्बम 30' गोळ्याबाबत पालिकेकडून नगरसेवकांना सूचना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसवरील प्रतिबंधात्मक औषध म्हणून अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्यांसाठी मागणी वाढली आहे. आर्सेनिकम अल्बम 30 गोळ्या खरेदी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं नगरसेवकांना त्यांच्या विकास निधीचा वापर करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. होमिओपॅथिक औषधाने कोविड 19 विरूद्ध प्रतिबंधात्मक औषध वापरासाठी शिफारस केली. अर्सेनिक अल्बम 30 या औषध वितरणास महापालिकेनं प्रायोगिक तत्त्वावर परवानगी दिली होती. त्यानंतर अनेक नगरसेवक, आमदार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारसंघात या गोळ्यांचे वाटप करू लागले. आता त्यांच्या संबंधित प्रभागांमध्ये या गोळ्यांच्या वितरणास खूपच उशीर झाला असं नगरसेवकांनी म्हटलं आहे.

आयुष मंत्रालयाने कोविड- 19 च्या विरूद्ध "प्रतिबंधात्मक आणि रोगप्रतिबंधक साधे उपाय" या यादीत आर्सेनिकम अल्बम 30 या गोळीचा समावेश केला आहे. मात्र असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत की हे औषध या व्हायरसविरुद्ध काम करते. 

बुधवारी मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नगरसेवकांना त्यांच्या विभागात आर्सेनिकम अल्बम 30 या गोळ्या खरेदी करण्यासाठी दहा लाखांपर्यंतच्या निधीचा वापर करण्याची परवानगी दिली. यासंबंधित आयुक्तांनी परिपत्रक जारी केलं आहे.

परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे की, आवश्यकता असल्यास कोविड- 19 संबंधित प्रतिबंधात्मक उपकरणाच्या खरेदीसाठी अतिरिक्त 5 लाख रुपये दिले जाऊ शकतात. पालिकेचे अधिकारी म्हणाले, नगरसेवकांच्या एका दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला. आता नगरसेवकांना आवश्यकतेबाबत पत्र मिळाल्यानंतर स्थानिक सहाय्यक नगरपालिका आयुक्त हे होमिओपॅथिक औषध खरेदी करू शकतात. 

यापूर्वी वर्षाला एक कोटी रुपयांचा विकास निधी वापरण्यास प्रशासनाने नगरसेवकांना परवानगी दिली होती. या निधीचा वापर प्रशासनानं पालिका कर्मचारी आणि सामान्य नागरिकांसाठी मास्क, सॅनिटायझर्स, गोल्व्हज, पीपीई किट, ऑक्सिमीटर, थर्मल गन, ऑक्सिजन सिलिंडर हे खरेदी करण्यासाठी करावा अशी सूचना दिली होती. पालिकेच्या निर्णयानंतर नगरसेवकांनी म्हटलं की, प्रशासनाच्या या निर्णयास उशीर झाला आहे. कारण बहुतेकांनी आधीच आपल्या विभागात अर्सेनिकम अल्बम 30च्या गोळ्या वितरित करण्यास सुरुवात केली आहे. 

याबाबत बीएमसीनं उशीरा निर्णय घेतला. जसे की आम्ही आधीच आमच्या स्वतःच्या स्रोतांद्वारे औषध वितरित केले आहे. माझ्या प्रभागात, मी हे औषध आधीच दोनदा वितरीत केलंय, असं महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी गुरुवारी सांगितले. रवी राजा यांनी सांगितले की,  त्यांनी औषधांच्या सुमारे पाच हजार बाटल्या वितरित केल्यात. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनीही पालिकेच्या निर्णयाला विलंबित निर्णय असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates Live : प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीत टाकता येणार नाही - छगन भुजबळ

Explained: लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात अन् कोणते उपाय करावे? वाचा आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

SCROLL FOR NEXT