मुंबई

उर्जामंत्र्यांचे आश्‍वासन हवेत विरलं, वीज ग्राहकांचा अपेक्षाभंग

तेजस वाघमारे

मुंबई : वाढीव वीजबिलांबाबत राज्यातील वीज ग्राहकांना दिवाळीपुवीं दिलासा देण्यात येईल, असे आश्‍वासन खुद्द उर्जामंत्री डॉ. नितिन राउत यांनी दिले होते. परंतू हे आश्‍वासन आता हवेत विरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. बुधवारी आयोजित होणारी मंत्रीमंडळ बैठक रद्द झाल्याने ऐन दिवाळीत वीज ग्राहकांना दिलासा मिळू शकला नसल्याने त्यांचा सरकारने अपेक्षाभंग केल्याची भावना ग्राहकांमध्ये पसरू लागली आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले दिल्याने आणि वीजेचे दर वाढल्याचा मोठा फटका बसला. आधीच कोरोना काळात नोकरी, धंदा गेल्याने जगायचे कसे हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला असतानाच वाढीव बिलांचा मोठा फटका बसला. वीज बिलामध्ये सवलत देण्यासाठी राजकीय पक्ष, संघटनांनी राज्य सरकारविरोधात असंतोष व्यक्त करत आंदोलने केली. यानंतर राज्य सरकारने ग्राहकांना दिलासा देण्याचा विचार सुरू केला. मात्र आजपर्यंत वीज ग्राहकांना दिलासा मिळू शकलेला नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दोन नोव्हेंबर रोजी दिवाळी आधी वीज बिल सवलती बाबत निर्णय होण्याची शक्‍यता, असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे सामान्य नागरिक या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते. परंतू दिवाळीचा दुसरा दिवस आला, तरी वीज ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही.

बुधवारी होणारी मंत्रीमंडळाची बैठक या आठवड्यात न झाल्याने वीज बिल सवलतीचा निर्णय पुन्हा लांबणीवर गेला आहे. याबाबत उर्जामंत्री नितिन राउत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

 ( संपादन - सुमित बागुल )

The assurance of the energy minister vanished in the air disappointment of consumers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT