Atal Setu Esakal
मुंबई

Atal Setu: अटल सेतूवर कुठून करायची एंट्री? रिक्षा, बाईकला परवानगी आहे का? सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

Atal Setu: अअटल सेतूवर कुठून करायची एंट्री? रिक्षा, बाईकला परवानगी आहे का? पूलावरती चढण्याचा आणि उतरण्याचा वेग ताशी किती असणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज लोकार्पण होणाऱ्या अटल सेतू पूलावर तुम्हा दुचाकी, रिक्षा घेवून जात असाल तर आत्ताच थांबा. भारतातील या सर्वात लांब सागरी पूलावर काहीच वाहनांना परवानगी असणार आहे. ती कोणती आहेत, त्यांची वेग मर्यादा किती असणार आहे. याबाबतची माहिती जाणून घ्या.

वेगमर्यादा किती असणार?

तब्बल २२ किलोमीटर लांबीच्या भारतातील सर्वात लांब 'अटल बिहारी वाजपेयी नाव्हा शेवा अटल सेतूचे लोकार्पण आज शुक्रवारी (ता.१२) पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या सागरी सेतूवरची वाहनांसाठीची वेगमर्यादा मुंबई वाहतूक पोलिसांनी निश्चित केली आहे. १०० किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा सर्व चारचाकी वाहनांसाठी ठेवण्यात आली आहे

कोणत्या वाहनांना परवानगी नाही?

देशातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगात १२ व्या क्रमांकाचा या सागरी सेतूवर कार, टॅक्सी, हलकी वाहने, मिनिबस, बस या सर्व वाहनांना परवानगी असणार आहे. मात्र, या वाहनांची वेगमर्यादा १०० किलोमीटर प्रति तास आखून देण्यात आली आहे. मोटरसायकल, मोपेड आणि तिनचाकी वाहने आटो रिक्शा, ट्रक्टर, जनावर वाहून नेणारी वाहने तसेच कमी गतीने चालणाऱ्या वाहनांवर सागरी सेतूवर पुर्णता बंदी घालण्यात आली आहे.

त्याचबरोबर, सागरी सेतूच्या चढताना आणि उतरतानाची वेगमर्यादा ही ४० किलोमीटर प्रति तास इतकी निश्चित करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूवर अपघात आणि वाहतूकीतील अडथळे टाळण्यासाठी वेगमर्यादा आखून देण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगीतले.

पूलावर कसं जाणार?

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक, बस या सारख्या अवजड वाहनांना पुर्व द्रुतगती मार्गावर प्रवेश नाही. मात्र या वाहनांना सागरी सेतूवर परवानगी आहे. त्यामुळे हा मार्गावर येण्यासाठी वाहनाचालकांना मुंबई पोर्ट-शिवडी एक्झिट मार्ग तसेच एमबीपीटी मार्गाचा वापर करुन उड्डाणपूलावर चढावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT