ATS Report Antilia Bomb Scare Case e sakal
मुंबई

'वाझे वारंवार...', अँटिलिया स्फोटक प्रकरणी ATS च्या अहवालात धक्कादायक माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणी (Antilia Bomb Scare Case) निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Waze) अटक झाली होती. एटीएस देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. याप्रकरणी एटीएसने एक अहवाल सादर केला असून सचिन वाझेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. (ATS Report Antilia Bomb Scare Case)

स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी अंबानींच्या अँटीलिया निवासस्थानी असल्याचं समजताच बॉम्ब निकामी करणारं पथक तिथं पोहोचले. त्यावेळी सचिन वाझे देखील तिथे आले. ते बराच वेळ गाडीजवळ थांबून होते. गाडीची तपासणी करायची असल्यानं त्यांना गाडीपासून लांब जाण्यास सांगितलं. मात्र, वाझे वारंवार कारजवळ येत होते. तिथेच घुटमळत होते. बॉम्ब निकामी पथकाच्या कामात देखील त्यांनी हस्तक्षेप केला. वाझेकडून अनेकदा प्रोटोकॉलचं उल्लंघन करण्यात आलं, अशी धक्कादायक माहिती अहवालातून उघड झाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? -

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. ही गाडी ज्या व्यक्तीची होती ते मनसुख हिरेन यांची देखील हत्या करण्यात आली. त्यानंतर एनआयएने सचिन वाझेला अटक केली. याप्रकरणी सध्या सचिन वाझे तुरुंगात आहे. दरम्यान, या प्रकरणात माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा हात असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. अँटिलिया प्रकरणाचे मास्टरमाईंड परमबीर सिंह होते, असं ईडीच्या जबाबामध्ये देशमुखांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT