mansukh.jpeg
mansukh.jpeg 
मुंबई

मनसुख हिरेन यांची हत्याच, ATS चा महत्त्वपूर्ण निष्कर्ष

दीनानाथ परब

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांच्याकडे प्रमुख संशयित म्हणून पाहिले जात आहे. सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केली, असा आरोप मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केला आहे. सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १९ मार्च रोजी सुनावणी होईल. या प्रकरणात कोर्टाकडून एटीएसला नोटीस बजावली जाऊ शकते. कारण मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. 

मागच्या महिन्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन वापरत होते. त्याच मनसुख हिरेन यांचा मृतदेह पाच मार्च रोजी ठाणे खाडीत आढळला होता. मनसुख हिरेन यांची स्कॉर्पियो कार चार महिने सचिन वाझे वापरत होते, असा दावा मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केला आहे. भाजपा आणि महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय संघर्षात आपल्याला टार्गेट केलं जाईल, ही भीती असल्याने वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. 

सीआययू म्हणजे गुन्हे शाखेतून सचिन वाझे यांची बदली आता नागरी सुविधा युनिटमध्ये झाली आहे. दरम्यान मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या ATS ने हिरेन यांची हत्या झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयए आणि एटीएसने मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या ठाणे खाडीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. मनसुख हिरेन ज्या ठिकाणाहून रहस्यमयी पद्धतीने बेपत्ता झाले, ते शेवटचे लोकेशन शोधून काढल्याचे एटीएसने सांगितले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT