मुंबई

धक्कादायक! मुंबईत क्वांरटाईन सेंटरमध्ये मुलीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा


मुंबई- मालाडमधील क्वांरटाईन सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 21 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घडना घडली आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तरुणीची कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्या बहाण्यानं आरोपीनं तिला क्वांरटाईन सेंटरमध्ये बोलावलं होतं. रविवारी दोघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणीची आणि तिच्या कुटुंबीयांची पूर्वी याच केंद्रात कोविड-19ची चाचणी करण्यात आली. तेव्हा त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. 

तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार, तिला तिच्या वडिलांच्या मोबाईल फोनवर एक कॉल आला. जिथे बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)तून बोलत असल्याचा दावा करणारा एक अज्ञात व्यक्ती म्हणाला की, मुलीची कोविड-19ची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं कुटुंबियांना सांगितलं आणि मालाड पश्चिमेकडील जनकल्याण नगर येथील न्यू भूमी पार्कमधील क्वांरटाईन सेंटरमध्ये नेण्याची आवश्यकता आहे.

माझ्या वडिलांना सांगण्यात आलं होतं की, एक रुग्णवाहिका मला क्वांरटाईन सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी येईल. 13 जून रोजी रुग्णवाहिका आली नाही. तेव्हा वडिलांनी मला ऑटो रिक्षातून तिथंपर्यंत सोडलं. तिथल्या अमित तटकरे नावाच्या व्यक्तीने मला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील एका खोलीत जाण्यास सांगितले. मी वर गेली. एक मुलगा खोली सॅनिटायझ करत होता. थोड्या वेळाने तटकरे खोलीत आला आणि मला सांगितले की तू कोरोना पॉझिटिव्ह नाही आहेस. मग माझ्यावर स्वत: वर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असं मुलीने आपल्या निवेदनात पोलिसांना सांगितले.

13 जूनला रात्री 11.30 ते 12 च्या दरम्यान पहिल्यांदा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर आरोपीनं तिच्यावर दोन-तीन वेळा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्या मजल्यावर दुसरं कोणी नव्हतं. दुसर्‍या दिवशी सकाळी तिची आई तिला घरी घेऊन गेली. मुलीनं घडलेला सर्व प्रकार 19 जूनला आपल्या कुटुंबियांना सांगितला.

तक्रार नोंदविली

कुटुंबाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिनेश साळवी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी घटनेची माहिती दिली. साळवी, मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांसह 20 जूनला अमित तटकरे आणि कल्पेश (आडनाव माहित नाही) यांच्याविरोधात पोलिस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. 21 जूनला पोलिसांनी अमितला अटक केली असून कल्पेशचा शोध सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT