मुंबई

पुतीन यांच्या जिवाला धोका, ट्रम्प होणार बहिरे; बाबा वन्गाची भारताबाबत भविष्यवाणी काय?

सकाळ वृत्तसेवा

येणारं वर्ष जगभर उलथापालथ घेऊन येईल. तुम्ही कल्पनाही केली नसेल, अशा घटना या वर्षात घडतील, असं भाकीत वर्तवलं जातंय. कोणी वर्तवलंय हे भाकीत आणि काय आहे त्याचं नव्या वर्षाबाबतचं भाकीत, आता आपण जाणून घेणार आहोत 

हे आम्ही नाही म्हणत : 

सर्व जग नव्या वर्षाच्या स्वागताला सज्ज झालंय. पण ज्या वर्षाचं आपण स्वागत करणार आहोत, ते वर्ष मात्र तुमच्या-आमच्यासाठी प्रलय, भूकंपसारख्या नैसर्गिक आपत्तींना सोबत घेऊन येणारं असेल. इतकंच नाही तर याच वर्षात जगाचं मोठ्या प्रमाणावर धार्मिक ध्रुवीकरण झालेलंही दिसून येईल. हे आम्ही नाही म्हणत, बाबा वेन्गा ( Vangeliya Pandeva Dimitrova)  नावाच्या एका भविष्यवेत्त्यानं ही भविष्यवाणी वर्तवलीय.

भविष्यवाणीत वर्तवलेल्या काही गोष्टी 

  • 2020 मध्ये सर्व जगभर उलथापालथ होत राहील.
  • लोकांना धर्माच्या आधारे विभाजीत केलं जाईल.
  • अनेक विनाशकारी घटना 2020 मध्ये होतील
  •  त्यानंतर लोक केवळ स्वतःचाच विचार करू लागतील.
  • 2020 मध्येच ब्रह्मांडात आणखी कुठे जीवन आहे, याचा शोध घेतला जाईल.
  • 2020 मध्ये पेट्रोलचं उत्पादन बंद होईल आणि ट्रेन्स सौरऊर्जेवर धावतील अशी भविष्यवाणीही बाबा वेन्गानं केलीय..

रशिया, भारत आणि चीन महासत्ता

त्याच्या भविष्यवाणीनुसार रशिया, भारत आणि चीन हे तीन देश एकत्रितपणे महासत्ता म्हणून पुढे येतील, असं भाकीतही त्यानं वर्तवलंय. त्याशिवाय युरोपात रासायनिक हल्ले  होण्याचं भविष्य त्यानं वर्तवलंय. युरोप आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एखाद्या गूढ आजाराला बळी पडू शकतात. ते बहिरे होऊ शकतात. अशी भाकीतं त्यांनी वर्तवलीत. बाबा वेन्गाच्या भाकितांकडे कायमच जगाचं लक्ष असतं. त्यांनी याआधी वर्तवलेली बरीच भाकितं खरी ठरल्याचा दावा केला जातोय.

कोण आहे बाबा वेन्गा

बाबा वेन्गाचं खरं नाव वेंगेलिया पांडेवा दिमित्रोवा असं आहे. ते मूळचे बल्गेरियाचे होते. 1911 मध्ये त्यांचा जन्म झाला तर 1966 मध्ये मृत्यू. 12 व्या वर्षीच त्यांची दृष्टी गेली. मात्र, त्यावेळी त्यांना जाणवलं की अनेक घटना घडण्याआधी त्या जाणून घेण्याची क्षमता त्यांना मिळालीय..

बाबा वेन्गाची भविष्यवाणी कितपत खरी होणार, हे पुढच्या वर्षी कळेलच. पण प्रत्येकानं हे जग सुंदर राहावं, यासाठी प्रयत्न केले तर किमान मानवनिर्मित आपत्तींना तरी तोंड द्यावं लागणार नाही हे नक्की.

Webtitle : baba vengas prediction about new year 2020

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT