Badlapur chandrayan  sakal
मुंबई

Badlapur News: हेंद्रेपाडा येथे उतरले चांद्रयान ३; हुबेहूब प्रतिकृती पाहायला नागरिकांची गर्दी!

राजेंद्र घोरपडे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या प्रतिकृतीचे लोकार्पण संपन्न!

सकाळ वृत्तसेवा

मोहिनी जाधव

प्रत्येकवेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न, आणि प्रभागाच्या विकासाचा ध्यास मनात ठेऊन, हेंद्रेपाडा येथे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे व माजी नगरसेविका रुचिता घोरपडे या दाम्पत्याच्या प्रयत्नातून, मराठी शाळा चौकात चंद्रयान ३ ची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली

असून, या प्रतिकृतीचे लोकार्पण माजी उपनगराध्यक्षा राजश्री घोरपडे, माजी नगरसेवक व भाजपा शहराध्यक्ष शरद तेली, यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक किरण भोईर, स्वामी दारविन, नरहरी पाटील, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, शहरातील इतर मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य म्हणजे, बदलापूर शहरातील हेंद्रेपाडा हा एकमेव प्रभाग आहे ज्या प्रभागात शिक्षण, क्रीडा, मनोरंजन, कला, या सर्वांगीण विषयाच्या दृष्टीने वेगवेगळी विकासकामे राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत.

मग यात, जिमखाना, क्रीडांगण, गार्डन, जॉगर्स पार्क, अभ्यासकेंद्र, आर्ट गॅलरी, वाचनालय, हे सारं काही उभारण्यात आलेलं आहे. त्यातच चौकाचौकात सुद्धा काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने यंदा अवघ्या जगात भारताच्या उपक्रमाने मान उंचावली असा चांद्रयान ३ चा यशस्वी प्रकल्प शिल्पाकृती मध्ये उभारण्यात यावा या संकल्पनेतून हेंद्रेपाडा येथील मराठी शाळा परिसरातील चौकात ही कलाकृती साकारण्यात आली आहे.

राजेंद्र घोरपडे यांच्या प्रयत्नातून हेंद्रेपाडा विभागातील वास्तूचे दर वधारले!

२००५ साली आलेल्या पुरात नदीपासून सखल भागात असलेल्या हेंद्रेपाडा विभागाचे सर्वाधिक नुकसान झाले. यावेळी पूर परिस्थिती ओसरल्यानंतर येथील जागेचे, घरांचे दर पुरते कोसळून गेले. अगदी ५ लाखांमध्ये घेतलेली घरे लोकं १ लाखात विकून निघून गेले.

यावेळी या प्रभागाचा पुन्हा विकास करायचा हा ध्यास मनात ठेऊन, गेल्या १९ वर्षात आता हेंद्रेपाडा विभागाचा कायापालट झाला असून, मुंबईतील विकसित प्रभागा प्रमाणे आता हेंद्रेपाड्यात विकासकामे पूर्णत्वास गेलेली आहेत. त्यामुळे आता बदलापूर पश्चिम परिसरात जागेचे व घरांचे सर्वाधिक दर असलेला हा प्रभाग असल्याने, अनेक नागरिक या प्रभागात घरांसाठी प्रतीक्षेत असतात. आणि हे सारं काही घोरपडे दाम्पत्याच्या प्रयत्नातून झाले असल्याचे यावेळी उद्घाटक राजश्री घोरपडे, शरद तेली यांनी बोलून दाखवले.

आपला प्रभाग हे आपलं कुटुंब आणि आपल्या घराचे अंगण समजून आम्ही गेली १५ ते २० वर्षे काम करत आहोत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा जगातील चौथा देश ठरलेल्या आपल्या देशाची ही मोहीम या ठिकाणी उभारण्याचे माझे धोरण हे होते की, हा चौक साधारण चार ते पाच शाळा आणि कॉलेज यांना जोडणारा आहे. त्यामुळे येथून ये जा करताना शाळकरी व महाविद्यालयीन मुलांना आपली ही मोहीम सतत डोळ्यांसमोर दिसावी व यातून त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशानेच ही प्रतिकृती येथे साकारण्यात आलेली आहे. पालिकेकडून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन ही शिल्पाकृती साकारण्यात आली आहे.

राजेंद्र घोरपडे

माजी नगराध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT