bala nandgaonkar & raj thackeray  
मुंबई

बाळा नांदगावकर मनसे सोडणार? सोशल मीडियावरून दिलं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. याआधी त्यांनी नाशिक आणि औरंगाबादचा दौरा केला. यावेळी राज ठाकरे यांचे जुने समर्थक बाळा नांदगावकर कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे ते मनसे सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. पुण्यात मनसेला रुपाली पाटील यांनी रामराम ठोकला. यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला. या सर्व घटना राज ठाकरे पुण्यात असताना घडल्या. त्यामुळे आणखी कोणते नेते मनसेला जय महाराष्ट्र करणार असा प्रश्न उपस्थित झाला.

दरम्यान, राज ठाकरेंचे (Raj Thackeray) जुने सहकारी बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) त्यांची साथ सोडणार का, असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर नांदगावकर यांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम लावला आहे. त्यांनी अधिकृत सोशल मीडिया साईटवरून यासंदर्भात माहिती दिली.

काय म्हणाले नांदगावकर?

मागील काही दिवसांपासून काही माझा पक्ष त्याग व परस्पर पक्ष प्रवेशाची बातमी अनेकांनी चालवली. सोशल मीडिया च्या युगात अशा बातम्या किती जोरदार पसरतात हे आपणांस माहीतच आहे. मागील अनेक वर्षांत राजकारणात पक्ष निष्ठा, व्यक्ती निष्ठा हे विषय गौण होऊन फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वरचेवर पक्ष बदलणारे जरी असले तरी सगळेच असे नसतात, असं नांदगावकर म्हणाले.

माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित आहे व राहील. त्यामुळे त्याबद्दल मला काहीच सांगायची गरज नाही, असं स्पष्टीकरण देत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम लावला. कारण जे मला ओळखतात त्यांना काहीच सांगायची आवश्यकता नाही नांदगावकर म्हणाले. एक जुने हिंदी गाणे माझ्या राजकारणाबद्दल व राजसाहेबांच्या आणि माझ्या संबंधाबद्दल सर्व एका कडव्यात सांगून जाते.

तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT