2000 Rupees Note
2000 Rupees Note Sakal
मुंबई

2000 Rupees Note: दोन हजारांच्या नोटांवरून बँकेत हाणामारी; बँक कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

नालासोपारा: दोन हजारांच्या नोटा बंद झाल्या आहेत. या नोटा बँकेत भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. याच नोटा बँकेत भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला वसईतील एका बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आधार कार्ड मागितले.

त्यानंतर ग्राहकाला मारहाण करत त्यांचा चष्मा तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

निखिल जैन असे मारहाण झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. त्यांचे वसईच्या माणिकपूर परिसरात जैन अँड जैन नावाचे दुकान आहे. या दुकानातील रोख रक्कम भरण्यासाठी सोमवारी (ता. २९) दुपारी १२ च्या सुमारास ते माणिकपूर येथील एका नामांकित बँकेत गेले.

या रकमेमध्ये काही दोन हजारांच्या नोटाही होत्या. रक्कम बँकेने बदलुन दिली; मात्र पुन्हा त्यांना सायंकाळी ५ च्या सुमारास बोलावून आधार कार्डाची मागणी केली. या दरम्यान जैन यांनी आरबीआयचे काय नियम आहेत, ते मला दाखवा, अशी मागणी बँक मॅनेजरकडे केली.

त्यानंतर बँक कर्मचारी आणि जैन यांच्यात वाद झाला. बँकेतील असिस्टंट मॅनेजर कार्तिक अय्‍यर यांनी जैन यांची रोख भरून घेऊ नका, अशी तंबी देत त्यांचा चष्मा तोडून टाकला, असा आरोप जैन यांनी पोलिस ठाण्यात तक्रारीत केला आहे.

जैन यांनी याचा व्हिडीओही तयार केला असून तो पोलिसांना दिला आहे. या प्रकरणाचा माणिकपूर पोलिस तपास करत आहेत. या सर्व प्रकारांबाबत बँक कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

''आमच्याकडे यासंदर्भात अदखलपात्र तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्याआधारे बँकेत पोलिस कर्मचारी पाठवून दोन हजारांच्या नोटा भरून घेताना कोणताही वाद करू नये, असा समज बँक कर्मचाऱ्यांना दिला आहे.'' असे संपतराव पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, माणिकपूर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT