file photo 
मुंबई

एसटीवर दिवाळखोरीचे सावट 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळातील योजनांचा बोजवारा उडाला असून, वारेमाप खर्च दिवाळखोरीत ढकलत आहे. त्यामुळे दोन महिने कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री लागली असून, निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके थकली आहेत. या परिस्थितीत कामगारांनी बंड केल्यास जबाबदार कोण, असा सवाल कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी केला आहे.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी कुलाबा येथे झाली; त्यावेळी आमदार भाई जगताप बोलत होते. या बैठकीत एसटी महामंडळातील 1200 कर्मचाऱ्यांनी कॉंग्रेसप्रणीत एसटी कर्मचारी कॉंग्रेस संघटनेत प्रवेश केला. एसटीची नवीन शिस्त व आवेदन पद्धती लाखो कर्मचाऱ्यांना वेठीस धरणारी आहे. त्यातच चांगल्या योजनांची अधिकारी आणि कंत्राटदारांनी वासलात लावली आहे. त्यामुळे एसटी महामंडळ सुमारे 5000 कोटी रुपये तोट्यात असल्याचा आरोप जगताप यांनी केला. 

एसटी महामंडळापुढे उत्पन्नवाढीशिवाय अन्य पर्याय नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे, प्रवाशांच्या संख्येतील वाढीसाठी प्रयोग करणे गरजेचे आहे. महामंडळाने उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव करणेही आवश्‍यक आहे, असे आमदार जगताप म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT