banner hoisted in Vikhroli datta dalvi got bail in offensive statements against CM Shinde case  
मुंबई

CM Shinde : 'टायगर इज बॅक'; मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या दळवींसाठी विक्रोळीत शिवसैनिकांची बॅनरबाजी

जामीनावर सुटका झाल्यानंतर विक्रोळीत दळवी यांच्या समर्थनात शिवसैनिकांनी बॅनरबाजी केली आहे.

रोहित कणसे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याने उद्धव ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना अटक करम्यात आली होती. यानंतर दळवी यांना शुक्रवारी मुलुंड न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. दरम्यान जामीनावर सुटका झाल्यानंतर विक्रोळीत दळवी यांच्या समर्थनात शिवसैनिकांनी बॅनरबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

'टायगर इज बॅक'

माजी महपौर व शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जाहीर सभेत अपशब्द वापरले होते. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला व त्यांना न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. कालच दळवी यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्या विक्रोळी विभागात शिवसैनिकांनी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर टायगर इज बॅक असा उल्लेख करण्यात आला आहे.

भांडुप येथे सोमवारी झालेल्या ठाकरे गटाच्या कोकणवासीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण करताना दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे. या भाषणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भांडुप पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आणि बुधवारी दळवी यांना अटक देखील करण्यात आली. त्यानंतर दळवी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

ज्जे बात ! नोकरांना माज दाखवणाऱ्या अंशुमनला स्वानंदीने चाबकाने फोडलं ; प्रोमो पाहून प्रेक्षकांना आनंद अनावर

UPSC Success Marathi : अभ्यासातील सातत्य, नियोजन आणि मार्गदर्शनामुळे कोल्हापुरातील कुरुंदवाडच्या ऋषिकेशने UPSC मध्ये ६१ वी रँक

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

SCROLL FOR NEXT