leptospirosis-1 
मुंबई

कोरोनापाठोपाठ आता पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिसचा धोका; मग अशी घ्या काळजी...

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनासोबतच यंदा पावसाळ्यात इतर आजारांचेही प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून अनेक सखल भागात पाणीही साचले आहे. जर पायावर किंवा शरीराच्या अन्य भागावर जखम असेल आणि पावसाच्या पाण्यातून चाललात तर लेप्टो होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग टाळण्यासाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार 72 तासात औषधोपचार करणे आवश्यक आहे. लेप्टो प्रतिबंधासाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने मुंबईकरांना आवाहन केले आहे. 

एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर जखम किंवा खरचटलेला भागाचा पावसाच्या साचलेल्या पाण्याशी संबंध आल्यास लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच अशा व्यक्तींनी 24 ते 72 तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे, अशी माहिती  महापालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिला आहे.

काय आहे लेप्टोस्पायरोसिस? 
अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यात 'लेप्टोस्पायरोसिस' या रोगाच्‍या 'लेप्टोस्पायरा' (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादूर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे (मूत्रातून) लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात संसर्गित होतात. अशा बाधीत झालेल्या पाण्याशी माणसाचा संबंध आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच, व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल तरी त्या जखमेतूनही लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. 

डोंबिवलीत कोरोना रुग्णांची परवड थांबणार; जोंधळे विद्यालयात 'इतक्या' खाटांची सुविधा...

लेप्टोबाबत महत्त्वाची माहिती 
ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एकदाच चालल्या आहेत, त्या 'कमी जोखीम' गटात, एकदाच पुराच्या पाण्यातून चाललेल्या पण अंगावर किंवा पायावर जखम असलेल्या किंवा चुकून पुराचे पाणी तोंडात गेलेल्या व्यक्ती या 'मध्यम जोखीम' गटात, तर अर्धा तासापेक्षा अधिक काळ पुराच्या पाण्यातून चालल्यास किंवा सतत पुराच्या पाण्याशी संपर्क आल्यास अशा व्यक्ती 'अतिजोखीम' या गटात मोडतात. मनुष्यापासून मनुष्याला लेप्टोच्या संसर्गाची बाधा होत नाही.

लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम; ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट...​

लेप्टोची लक्षणे कोणती -
ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्त्राव इत्यादी लक्षणे आहेत. रुग्णांना श्वासोच्छश्वास करण्यास त्रास होणे, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अशी लक्षणेही आढळतात. त्यांना योग्यवेळी औषधोपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका असतो.

मोठी बातमीः बाळासाहेब थोरात यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला...

काय काळजी घ्यावी

  • पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यु, मलेरिया अथवा 'लेप्टोस्पायरोसिस' असू शकतो. त्यामुळे, तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा.
  • साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावे.
  • ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळू न देणे, उंदरासाठी सापळे ठेवणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरात आणावे.
  • घरात आणि आजुबाजूला कचरा साठणार नाही, याची दक्षता घ्यावी व कच-याची विल्हेवाट लावावी.

----
संपादन ः ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT