मुंबई

आता कस्तुरबात दिवसाला ८०० चाचण्या करणं होणार शक्य, कारण कस्तुरबात आलंय 'हे' नवीन मशीन

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोना व्हायरस सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव हा मुंबईत झाला आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढता आलेख बघता कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत कोरोना चाचणीचं नवं यंत्र दाखल झालं आहे. या यंत्रामुळं कस्तुरबामधील चाचण्यांच्या क्षमतेत 300 नं वाढ झाली आहे. या यंत्रामुळे कस्तुरबा रुग्णालयात आता प्रतिदिन 700 ते 800 चाचण्या करणं शक्य होणारेय. 

कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत एक RTPCR यंत्र आधीपासून उपलब्ध होते. या यंत्राची क्षमता 300 चाचण्यांची आहे. याचीच क्षमता आणखीन वाढवण्यासाठी महापालिकेनं नवे यंत्र खरेदी केलं. दरम्यान हे यंत्र आता रुग्णालयात कार्यरत झालं आहे. त्यामुळे कस्तुरबामध्ये प्रतिदिन 700 ते 800 चाचण्या करणे शक्य होणारेय.

दुसरीकडे कूपर रुग्णालयातही नवे यंत्र खरेदी करून चाचण्या सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. याची क्षमता दरदिवशी सुमारे 300 चाचण्यांची असणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयातही नवे यंत्र खरेदी केले असून ते लवकरच कार्यरत होईल, असं सांगण्यात आलं आहे. तर महापालिकेनं आणखी 3 खासगी प्रयोगशाळांशी करार केल्याची माहिती समोर येत आहे. या तिन्ही प्रयोगशाळांची एकत्रित दरदिवशी सुमारे 900 चाचण्यांची क्षमता आहे.

दोन महिन्यांपूर्वीच कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं कस्तुरबा रुग्णालयातच कोरोना व्हायरस चाचणी केंद्र सुरु केलं आहे. तसंच या रुग्णालयात सुरक्षित चाचणी कक्षही तयार करण्यात आला आहे. या कक्षामुळे चाचणी करणारे डॉक्टर्स आणि संशयित यांचा एकमेकांशी संपर्क येत नाही. दक्षिण कोरिया टेलिफोन बूथवर फोनवर बोलण्यासाठी असलेल्या छोट्या खोलीसारखा कक्ष उभारुन कोरोना चाचण्या करण्यात येतात. असाच प्रयोग केरळमध्येही करण्यात आला आहे. 

पावसाळी आजारासाठी पालिकेकडून विशेष रुग्णालयासाठी नियोजन

कस्तुरबा रुग्णालयात साथीच्या रोग आजारांचे निदान आणि त्यावर उपचार केले जातात. मात्र सध्या या रुग्णालयात कोविड-19च्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून मलेरियाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र तरीही डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसचा त्रास मात्र वाढला आहे. पावसाळ्यात दुषित पाण्यातून होणाऱ्या आजारांमध्ये काविळीचं प्रमाणही जास्त असते. याच पार्श्वभूमीवर पालिका या विशेष रुग्णालयाचं नियोजन करत आहे. या विशेष रुग्णालयात 80 ते 100 खाटा उपलब्ध असतील. तर गजर पडल्यास ही क्षमता आणखी वाढवण्यात येईल.

because of latest RTPCR machin now upto 800 corona test can be done in kasturba hospital

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूने गमावली तिसरी विकेट! आक्रमक खेळणारा रजत पाटिदार आऊट, अर्धशतकही हुकलं

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT