Punjab Mail
Punjab Mail Punjab Mail
मुंबई

मुंबईतून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल  

कुलदीप घायवट

मुंबई: पहिल्याच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे (Mumbai rain) रेल्वे मार्गावर पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प झाली. पहिल्याच पावसात रेल्वे आणि महापालिकाने नालेसफाई पूर्ण केल्याचा दावा फोल ठरला आहे. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. लोकल सेवेसह मुंबईतून सुटणाऱ्या एक्स्प्रेसचे वेळापत्रक (express time table) कोलमडले. मध्य रेल्वे मार्गावरून सीएसएमटी आणि एलटीटीवरून सुटणाऱ्या एक्स्प्रेसचे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. (Because of rain in mumbai mail-express time table changed)

मंगळवार-बुधवारच्या रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. याचा प्रवाशांना फटका बसला. पावसामुळे रेल्वे रूळावरून पाणी वाहू लागल्याने रेल्वे सेवा ठप्प केली. परिणामी, अनेक एक्स्प्रेस शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या.

सीएसएमटी-आसनसोल विशेष एक्स्प्रेस, सीएसएमटी-गोरखपुर विशेष एक्स्प्रेस, सीएसएमटी- हैद्राबाद विशेष एक्स्प्रेस, सीएसएमटी-हावडा, सीएसएमटी-शालिमार पार्सल ट्रेन या विशेष एक्स्प्रेस सारख्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.

गाडी क्रमांक 02362 सीएसएमटी ते आसनसोल विशेष एक्स्प्रेस सकाळी 11.05 ऐवजी सायंकाळी 6 वाजता सुटली. गाडी क्रमांक 02598 सीएसएमटी- गोरखपुर विशेष एक्स्प्रेस दुपारी 1.30 वाजता ऐवजी दुपारी 3.30 वाजता सुटली. गाडी क्रमांक 01019 सीएसएमटी ते भुवनेश्वर विशेष एक्स्प्रेस 6 वाजून 30 मिनिटांनी सुटली. गाडी क्रमांक 07031 गाडी क्रमांक सीएसएमटी- हैद्राबाद विशेष एक्स्प्रेस 6 वाजून 30 मिनिटांनी सुटेल, गाडी क्रमांक 02701 सीएसएमटी- हैद्राबाद विशेष एक्स्प्रेस मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनी सुटेल, गाडी क्रमांक 02322 सीएसएमटी -हावडा विशेष एक्स्प्रेस मध्यरात्री 2 वाजता सुटेल, गाडी क्रमांक 02193 सीएसएमटी- वाराणसी विशेष एक्स्प्रेस पहाटे 4 वाजता सुटेल, गाडी क्रमांक 00113 सीएसएमटी-शालिमार पार्सल ट्रेन सकाळी 8 वाजता सुटेल.

गाडी क्रमांक  03202 एलटीटी -पटना विशेष एक्स्प्रेस दुपारी 4 वाजून 25 ऐवजी रात्री 7 वाजून 10 मिनिटांनी सुटेल, गाडी क्रमांक 02107 एलटीटी-लखनऊ विशेष एक्स्प्रेस दुपारी 4 वाजून 25 ऐवजी रात्री 7 वाजून 10 मिनिटांनी सुटेल, गाडी क्रमांक  01081  एलटीटी-गोरखपूर विशेष एक्स्प्रेस दुपारी 4 वाजून 40 ऐवजी 7 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि गाडी क्रमांक 02141 एलटीटी  -पाटलीपुत्र विशेष एक्स्प्रेस रात्री 11 वाजून 35 ऐवजी मध्यरात्री 3 वाजता सुटणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT