मुंबई

अखेर डबल डेकर बस धावली रस्त्यावर, 'या' मार्गावर असेल सेवा

पूजा विचारे

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे. अशात सध्या मुंबईत लोकल ट्रेन बंद असल्यानं बेस्ट बसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र काही दिवसांपूर्वी सोशल डिस्टन्सिंगच्या काळात डबर डेकर बसची आवश्यकता असल्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर बेस्टनं बुधवारी शहरातील सर्वात लांब डबल डेकर बससाठी आपला मार्ग उघडला. या बसेसच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या. सध्या ही डबल डेकर बस मार्ग क्रमांक 124 वरळी ते कुलाबा दरम्यान 12.2 किमी अंतर चालविते.

124 मार्गावरील डबल डेकर बस 29 जुलैपासून पुन्हा सुरू केल्या जातील, असा बोर्ड वरळी बस आगारात लावण्यात आला होता. बस मार्ग 124 सर्वात लोकप्रिय डबल डेकर बस मार्गांपैकी एक आहे,  सी फेसला जोडणारा वरळी ते कुलाबा दरम्यान हा जोडणारा मार्ग आहे. बेस्टमध्ये आतापर्यंत 120 डबल डेकर बसेस आहेत.

मार्गदर्शक सूचनांनुसार डबल डेकर बसेसमध्ये एकच कंडक्टर असेल. वरच्या डेकवर प्रवाशांना केवळ बसण्यासाठी परवानगी असणार आहे. बसच्या खालच्या डेकवर, बसलेल्या प्रवाश्यांव्यतिरिक्त, फक्त पाच उभे प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एकदा ही मर्यादा पूर्ण झाल्यानंतर बसमध्ये चढण्यास आणखी प्रवाशांना परवानगी मिळणार नाही.

या सोशल डिस्टन्सिंगच्या स्थितीत, प्रवासी वाहन क्षमता अर्ध्याने खाली गेली असली तरी, डबल डेकर सरासरी एकल-डेकर बसपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाऊ शकतात.

BEST Double Decker bus route distance between Worli and Colaba

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT