best 
मुंबई

धक्कादायक! अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून 'सोशल डिस्टंन्सिंग'वर भर दिला जात आहे. मात्र पालिकेचे हेच निर्देश बेस्ट प्रशासनाकडून धाब्यावर बसवण्यात येत आहेत. बेस्टच्या प्रत्येक आगारात कर्मचाऱ्यांची गर्दी होत असून बेस्ट प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

मुंबईसह देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असून एका ठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लोकांनी एकमेकांपासून दूर राहावे म्हणून 'सोशल डिस्टंन्सिंग' पाळण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. पालिकेच्या या आवाहनाला त्यांचेच अंग असलेल्या बेस्ट प्रशासनाकडून धाब्यावर बसवले जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर सोडल्याचे दिसते.

बेस्टच्या आगारांमध्ये चालक, वाहक आणि इतर कर्मचारी लॉकडाऊन असतानाही आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र कामगारांच्या सुरक्षेची काळजी बेस्ट प्रशासन घेताना दिसत नसल्याचे चित्र आहे. आगारात आलेल्या कर्मचाऱ्यांना एकाच चौकीमध्ये दाटीवाटीने कोंबले जात आहे, एकाच खिडकीवर या कर्मचाऱ्यांना रिपोर्टिंग करावी लागत असल्याने तिथे गर्दी होत आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठीही एकच खोली असल्याने कर्मचाऱ्यांनाही दाटीवाटीने एकाच खोलीत थांबावे लागत आहे.

बेस्टच्या गोरेगाव, मरोळ, वरळी, पोयसर, कुर्ला, मजास डेपो, सेंट्रल डेपो, ओशिवारा, मालवणी या आगारांतील ही परिस्थिती असून मालवणी आगारातील सहायक आगार व्यवस्थापकांनी आपल्या दालनामध्ये कामगारांची बैठक घेऊन सर्व आदेश धाब्यावर बसवले. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून कामगारांमध्ये कोरोनाची भीती पसरली आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून कामगार कामावर येतात. या कामगारांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोव्हज देणे महत्वाचे आहे; मात्र बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप बेस्ट एम्प्लॉईज युनियनने केला आहे.

कोरोनाबाबत आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन बेस्ट प्रशासन करताना दिसत नाही. त्यामुळे कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्याविरोधात बेस्ट महाव्यवस्थाक, पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. - नितीन पाटील, अध्यक्ष, बेस्ट एम्प्लॉईज युनियन

कर्मचाऱ्यांना मुबलक प्रमाणात मास्क,सॅनिटायझर,हॅन्डग्लोज यांचे वाटप केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली आहे. एखाद्या आगारात काही समस्या असल्याचं माहिती घेतली जाईल. - सुरेंद्र बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT