मुंबई

बोंबला! बेस्ट कर्मचाऱ्यांना पगारात मिळाली नुसती 'चिल्लर'! वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बेस्ट बसनं अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा पुरवत आहे. सरकारी, पालिका, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांसाठी बेस्ट सेवा सुरु आहे. अशातच कोविड-19च्या संकटामुळे बेस्ट आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार सुट्टे पैशांच्या स्वरुपात देत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार हा सुट्टे पैसे असा दिला आहे. कर्मचाऱ्यांना सुट्टे पैसे दिल्यानं बँकांमध्ये पैसे जमा करण्यात समस्या निर्माण होत आहेत. पैसे गोळा करण्यासाठी डेपोमध्ये येऊ शकत नसून असहाय्य असल्याची प्रतिक्रिया क्वांरटाईन असलेल्या एका बेस्ट कर्मचाऱ्यानं दिली आहे.

सोमवारी मे महिन्यातील पगाराच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली. कर्मचाऱ्यांना द्यावयाची रक्कम ही पोत्यात ठेवण्यात आली आहे आणि त्यांना त्यांचे पैसे एका पाऊचमध्ये देण्यात आलेत. 

एकूण पगाराच्या रकमेपैकी, बस डेपोमध्ये 5 हजार रुपयांची रक्कम वितरित केली जात आहे. ( 4 हजार नोटा स्वरुपात असून त्यात 20 आणि 100 रुपयांच्या नोटा आणि 1 हजार रुपयांची नाणी आहेत.) उर्वरित पगार संबंधित बँक खात्यात जात असल्याचं एका बस कंडक्टरनं सांगितलं. माझ्या पगाराच्या भाग म्हणून मला 5 हजार रुपयांची नाणी मिळाली. परंतु हे नाणी वापरणं अवघड होणार आहे. बेस्ट ही एक मोठी सरकारी संस्था असून त्यांच्याकडे काही पातळीवर पैशांची देवाणघेवाण करण्याचं साधन देखील आहे, आमच्याकडे ते नसल्याचं एका बस ड्रायव्हरनं सांगितलं. 

बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस जगनारायण कहार यांनी सांगितले की, लोकल गाड्या बंद असतानाही बेस्ट बसचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. त्यांच्यावर अशाप्रकारे अन्याय करणे चुकीचं आहे. लोकल रेल्वे ठप्प असताना बेस्ट बसेस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाटी शहरातील एकमेव लाईफलाईन बनली होती. बेस्टचे प्रवक्त्यानं सांगितलं की, केवळ पगाराचा काही भाग सुट्टया पैशांमध्ये वितरित करण्यात आला आहे. 

बेस्टला मिळालं तब्बल इतक्या लाखांचं उत्पन्न 

बेस्ट बसमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणारे अडीच लाख सरकारी कर्मचारी, पालिका अधिकारी, पोलिस प्रवास करताहेत. त्यामुळे आता तब्बल सहा लाख प्रवाशांची वाहतूक होत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमानं दिली आहे. बेस्टला या सहा लाख प्रवासी वाहतुकीमुळे सुमारे 56 लाख रुपयांचे उत्पन्न मिळालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT