मुंबई

आधीच कंगाल असलेली 'बेस्ट' मंत्र्यांवर मात्र मेहरबान; चार ते पाच महिन्यांपासून वीज बिल नाही

समीर सुर्वे


मुंबई : कर्जबाजारी बेस्ट उपक्रम सामान्य वीज ग्राहकांकडून अवाजवी रकमेचे बिल वसूल करत असताना राज्यातील मंत्र्यांवर मेहरबान झाली आहे.  चार ते पाच महिन्यांपासून अनेक मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांचे वीज बिलच बेस्टने पाठवले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कर्जबाजारी असलेली बेस्ट महापालिकेकडून मिळणा-या अनुदानावर तग धरुन आहे. त्यातच कोव्हिडच्या काळात वीज मिटरची पाहाणी न करताच बेस्ट अनेक ग्राहकांना हजारो- लाखो रुपयांची बिले पाठवली. मात्र, 15 मंत्र्यांसह 17 शासकिय बंगल्यांचे वीज बिलेच पाठवली नाहीत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत ही माहिती मिळवली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांनी ही माहिती मिळवली आहे.

यांच्या निवासस्थानांना पाच महिन्यांपसून बिल नाही 
दादा भुसे, के. सी. पाडवी, अमित देशमुख, हसन मुश्रीफ आणि संजय राठोड यांच्यासह विधानपरीषदेच्या उपसभापती डॉ.निलम गो-हे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागर अजोय मेहता

यांच्या निवासस्थानाला 4 महिन्यांपासून बिल नाही 
डॉ जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, ॲड. अनिल परब

सामन्यांना वीज बिल भरण्याची सक्ती करणारी बेस्ट मंत्र्यांच्या निवासस्थानाची बिलही पाठवत नाहीत, या बद्दल  आश्चर्यही वाटते. 
- अनिल गलगली,
माहिती अधिकार कार्यकर्ते

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT