Ashish Shelar - Best Bus
Ashish Shelar - Best Bus Team eSakal
मुंबई

पाकिस्तानी एजन्टसाठी 'बेस्ट' भंगारात काढल्या? शेलार यांचा सवाल

सुधीर काकडे

मुंबई : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये (BJP) गेल्या काही दिवसांपासून मोठा संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. विशेत: शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपने आजवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यातच आता भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईतील बेस्टवरून (Best Bus) देखील काही सवाल उपस्थित केले आहे.

आशिष शेलार यांनी 'पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या 185 गाड्या बेस्टने भंगारात काढल्यात..का?' असा सवाल उपस्थित केला आहे. तसंच पुढे त्यांनी अजूनही काही सवाल उपस्थितल केले आहेत. "बेस्टमध्ये बसचा तुटवडा निर्माण करायचाय का? 2800 कोटींचे टेंडर ज्याला दिलं त्या पाकिस्तानी एजन्ट तुमूलुरीच्या कंपनीच्या ई बसची गरज निर्माण करायचीय का? सारे काही त्या आंतरराष्ट्रीय घोटाळेबाजासाठी सुरु आहे का? ये ना चोलबे!" असे सवाल करत शेलारांनी एक नवा मुद्दा उपस्थित केला आहे.

दरम्यान, आगामी काळातील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात सुरु असलेल्या अनेक घडामोडींच्या मागे निवडणुकाच असल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जातंय. त्यामुळे आता या आरोपांवर मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असेलल्या शिवसेनेची काय भूमिका असणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT