बेस्ट कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू 
मुंबई

बेस्टच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मानखुर्द (बातमीदार) : मानखुर्दच्या मोहिते पाटील नगरातील एका बेस्ट कर्मचाऱ्याचा (वय 45) कोरोनामुळे रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. ते बेस्टच्या शिवडी आगारांतर्गत विद्युत पुरवठा विभागात कार्यरत होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची लक्षणे आढळल्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवले होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यावर गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. ते एक कलाकारदेखील होते. बेस्टच्या एकांकीकेत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, आतापर्यंत 13 बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

गेल्या आठवड्यात म्हाडा वसाहतीतील आरोग्य शिबिरामध्ये या कर्मचाऱ्याची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर माहूल येथील विलगीकरण कक्षात ठेवले होते. विलगीकरण कक्षात असताना गुरुवारी (ता. 28) त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यावेळी गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तपासणी अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Peru Plane Crash : पेरूमध्ये पर्यटकांचे विमान कोसळले, १३ जणांचा मृत्यू; नाझ्का लाइन्स पाहताना काळाने गाठले

Mumbai News: मुंबईवर आता सीसीटीव्हीची नजर, उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांना दणका; महापालिकेचा मोठा निर्णय

Mahabaleshwar Road: महाबळेश्वर-तापोळा मार्ग पुन्हा धोक्यात! मुसळधार पावसाने रस्ता खचला; अवजड वाहनांना बंदी

Maharashtra El Nino Effect : कमी दाबाचा पट्टा ओसरला, महाराष्ट्रात आता पावसाची प्रतिक्षा; अल निनोचा प्रभाव तीव्र होणार?

MSRDC Airlift Service: द्रुतगतीवर जखमींना करणार ‘एअरलिफ्ट’! एमएसआरडीसीचा अभ्यास सुरू; समृद्धी, मुंबई-पुणे मार्गावर लवकरच सेवा

SCROLL FOR NEXT