tmc 
मुंबई

ठाण्यात साथरोग रोखण्यासाठी महत्वाच्या उपाययोजना,वाचा

सकाळवृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात साथीचे आजार देखील आपली डोकेवर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात साथरोगाचा उद्रेक होवू नये यासाठी, खबरदारीची उपापयोजना म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तैनात केले आहे. तसेच पुरेसा औषधांचा साठ देखील तयार ठेवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरीकांच्या आरोग्याची धूरा जिल्हा आरोग्य विभागाच्या खांद्यावर असते. त्यात पावसाळाच्या काळात ग्रामीण भागात साथीच्या आजारांच्या फैलाव होवू नये याकरीता, मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी ब. भी. नेमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी पाच तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी यांची व्हिडीओ कॉंन्फरंसद्वारे नुकतीच बैठक घेण्यात आली. 

यावेळी ग्रामपंचायतींना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पावसाळ्याच्या काळात आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या तेसच, कुठेही जलजन्य आजाराची साथ पसरु नये याकरीता सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या. पाच तालुक्यातील 33 प्राथमिक आरोग्य केंद्रात साथरोग नियंत्रण कक्ष सुरु करण्याबरोबरच वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि साथरोग नियंत्रण आरोग्य अधिकरी आदींचे तीन पथके तैनात ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच पुरेसा औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. तसेच जिल्हा स्तरावर शिघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना देखिल करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात    
दरम्यान, जिल्ह्यातील शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला तर, ग्रामीण भागात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. त्यात पावसाळा देखील सुरु झाल्यामुळे साथरोगाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता जिल्हा आरोग्य विभागाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच साथीचे आजारांचा फैलाव होवू नये, याकरीता संपुर्ण जिल्हा आरोग्य विभागा सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी दिली.

Beware, Thanekars, other diseases are on the rise during monsoons

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT