Passenger accident near Bhayandar creek

 

esakal

मुंबई

Bhayandar accident : भाईंदर खाडी परिसरात 'चंदीगड एक्सप्रेस'मधून प्रवासी पडला; रेल्वे प्रशासनाकडून चौकशी होणार!

Passenger accident near Bhayandar creek : या घटनेमुळे काही काळ चंदीगड एक्सप्रेस एकाच ठिकाणी थांबून राहिली, अन् परिणामी प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

Mayur Ratnaparkhe

Passenger falls from Chandigarh Express near Bhayandar creek : भाईंदर खाडी परिसरात आज(रविवार) दुपारी चंदीगड एक्सप्रेसमधून एक प्रवासी खाली पडल्याची घटना घडली. प्रवासी खाली पडल्याचे लक्षात येताच एक्सप्रेसमधील गार्ड तत्काळ खाली उतरून जखमी प्रवाशाला मदत करू लागला. मात्र त्याचवेळी लोको पायलटने गाडी पुढे नेल्यामुळे गार्ड आणि पायलट यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला.

या घटनेमुळे काही काळ चंदीगड एक्सप्रेस एकाच ठिकाणी थांबून राहिली. परिणामी प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले, तसेच या विलंबाचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेवर देखील झाला. रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान,उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेस दोन भागात विभागली गेली. एका जोडणीत तुटल्याने मागील तीन डबे वेगळे झाले. ट्रेनचा वेग कमी असल्याने अपघात टळला. चार तासांनंतर तांत्रिक पथकाने डबे पुन्हा जोडून ट्रेनला सोडण्याची परवानगी दिली गेली.

तर, कुर्ला रेल्वेस्थानक परिसरातील उन्नत रेल्वेमार्ग प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. काही वर्षांपासून जमीन आणि जागेच्या अडचणींमुळे ठप्प झालेले काम आता पुन्हा सुरू होत आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार, सुमारे ४१० मीटर लांबीचा रॅम्प बांधकामासाठी तयार असून दोन्ही बाजूंची जागा पूर्णपणे मोकळी करण्यात आली आहे. या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण उन्नत रेल्वेमार्गाचा आराखडा वेगाने आकार घेईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : राज्यात पारा घसरला, तापमान ६ अंशावर; पुढील दोन दिवसांत हवामानात होणार मोठा बदल

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

माेठी अपडेट! सातारा जिल्ह्यातील एमडी ड्रग्जच्या छाप्यात ११५ कोटींचा मुद्देमाल जप्त;चौघांना कोठडी, मोठा खुलासा होणार?

Driving License : पुण्यात वाहन परवान्यांचा ‘टॉप गियर’; सुमारे २ लाख परवाने वितरित

Pune Satara Highway : पुणे-सातारा दरम्यान ४० कि.मी.च्या सेवा रस्त्याचे विस्तारीकरण

SCROLL FOR NEXT