मुंबई

अशक्य ते शक्य झाले? भिवंडी शहराला कचरामुक्तीत 'थ्री स्टार'

शरद भसाळे

भिवंडी : स्वच्छ भारत अभियानाचे मूल्यांकन करण्याकरिता घेण्यात येणार्‍या 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' स्पर्धेच्या विविध निकषांपैकी एक असलेल्या कचरामुक्त शहर (garbage free city) मानांकन अंतर्गत भिवडी शहराला 'थ्री-स्टार' रेटिंग मिळाले आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातर्फे मंगळवारी (ता. 19) घोषित झालेल्या कचरामुक्त शहर तारांकित मानांकन स्पर्धेच्या निकालानुसार हे रेटिंग मिळाल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली.

भिवंडी शहरातील घनकचऱ्याचे संकलन व वाहतूक, ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण, क्षेपणभूमीवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट, जलस्त्रोत व नाले सफाई, शहरातील साफसफाई याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया तसेच इतर स्वच्छतेबाबतचे परीक्षण केंद्रीय पथकाने जानेवारी 2020 मध्ये केले होते.

भिवंडी पालिका कार्यक्षेत्रात दररोज सुमारे 280 टन कचरा निर्माण होतो. डम्पिंग ग्राऊंडवर कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने हाताळल्याचा 
निष्कर्ष परीक्षकांनी नोंदवला. भिवंडी पालिकेचा शहरातील कचरा जमा करण्याच्या पद्धतीत काही सुधारणा झाली आहे.

कचरा व्यवस्थापनामध्ये केलेल्या सुधारणोमुळे, तक्रारी सोडविण्यामध्ये आणि कचऱ्याची योग्यरितीने हाताळणी केल्यामुळे पालिकेला हा क्रमांक मिळाला असल्याचे आयुक्त डॉ. आष्टीकर यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या वतीने 'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत दैनंदिन सफाई, हागणदारीमुक्त, प्लास्टिक बंदी, नालेसफाई आदी कामांवर सरकारचा भर होता. त्यानुसार पालिकेचा कारभार सुधारल्याचे परीक्षकांना दिसून आले. 

नागरिकांकडून आश्चर्य...
  शहरात निर्माण होणारा कचरा रोजच्या रोज उचलला जात आहे. त्याचे वर्गीकरणही केले जात असल्याचा दावा पालिकेकडून केला जात असताना प्रत्यक्षात तसे होत नाही. याशिवाय घंटागाड्या सुद्धा वेळेवर येत नाहीत. असे असताना पालिकेस 'थ्री स्टार' रेटिंग मिळाल्याबद्दल काही नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कचरा तक्रारीचे प्रमाणही वाढले आहे. मात्र सध्या सर्वत्र चिडीचूप असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. 

  महाराष्ट्रातील 34 महापालिका, नगरपालिका गटामध्ये भिवंडी पालिकेस कचरामुक्त अभियानात थ्री स्टार मानांकन मिळाले असून येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर चांगले मानांकन मिळेल अशी अपेक्षा आहे. 
- डॉ. प्रवीण आष्टीकर
आयुक्त, भिवंडी महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT