मुंबई

सर्वात मोठी बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 12 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलिस दलातील 12 उपायुक्तांची खांदेपालट करण्यात आले आहे. मुंबईतील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर या बदल्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

उपायुक्त (बंदर) डॉ रश्मी करंदीकर यांना आता मुंबईतील सायबर विभागाची जबाबदारी सोपण्यात आली आहे. त्यांच्या जागी विशेष शाखा-1चे उपायुक्त शंकर शिंदे यांची बदली करण्यात आली आहे.

मंत्रालयासह अनेक महत्त्वाची प्रशासकीय कार्यालय असलेल्या परिमंडळ-1 वर परिमंडळ-7चे उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर परिमंडळ-1चे उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांची उपायुक्त(ऑपरेशन) पदावर बदली करण्यात आली आहे.

परिमंडळ-7वर उपायुक्त प्रशांत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त शहाजी उपम यांची विशेष शाखा-1च्या उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी उपायुक्त डॉ मोहन दहिकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सायबर विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांना परिमंडळ-11 चे पद देण्यात आले आहे. तर परिमंडळ-5 वर प्रणय अशोक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक शस्त्रगार विभागाचे नंदकुमार ठाकूर यांना मुख्यालय-1 पदी बदली देण्यात आली आहे.

याशिवाय परिमंडळ-5च्या उपायुक्त नियती ठाकेर-दवे यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले आहे. ते गुप्तवार्ता विभागाच्या सहसंचालक पदाची धुरा सांभाळणार आहेत.

याशिवाय परिमंडळ-3चे उपायुक्त अभिनाश कुमार हेही केंद्रात प्रतिनियुक्तीला गेले होते. त्यामुळे त्याचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात उपायुक्त एन. अंबिका यांच्याकडे देण्यात आला होता. पण आता अंबिका यांची नियुक्ती परिमंडळ-3 वर नियमीत करण्यात आली आहे. 

याबाबतचे आदेश गुरूवारी गृहविभागाने जारी केले.

big news from mumbai transfers of various police commissioner amid corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणे मेट्रोचा मोठा निर्णय! बंद असलेले गेट्स आता पूर्वीसारखे उघडणार नाहीत; मंगळवारी वेळेत बदल

Police Action: धूलिवंदनला कायद्याचा कडक पहारा! उल्हासनगर पोलिस सतर्क; समाजकंटकांवर राहणार करडी नजर

Latest Marathi News Live Update: इ-चलन विरोधात वाहतूक संघटनांचा एल्गार, मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ

जगावर घोंगावतंय महायुद्धाचं संकट! Baba Vanga यांनी दशकांपूर्वीच केली होती भीषण युद्धाची भविष्यवाणी; सध्याच्या घटनांशी जुळतंय का भाकीत?

IND vs ENG: २ पराभव अन्... ! भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या आकडे कोणाच्या बाजूने

SCROLL FOR NEXT