माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील, प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांचा सत्‍कार करताना कार्यकर्ते. 
मुंबई

स्थानिकांना न्याय देण्यासाठी भाजप सक्षम

सकाळ वृत्तसेवा

उरण : दुसऱ्याला सन्मान दिल्याने मोठेपणा वाढतो. त्यामुळे जनतेचा सन्मान करा. जनतेचा सन्मान न केल्यामुळे जिल्ह्यातून शेकाप हद्दपार होत आहे. स्थानिकांना न्याय मिळणे गरजेचे आहे, त्यासाठी भाजपच सक्षम आहे. सर्वांचा विकास करण्याचे भाजपचे ध्येय आहे. त्यामुळे लवकरच रायगड जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. शनिवारी (ता. १५) उरणमधील भाजप आमदाराच्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी पेणचे आमदार रवीशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, तालुका महिला अध्यक्षा रत्नप्रभा घरत, जिल्हा प्रवक्‍ते वाय. टी. देशमुख, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, तालुका अध्यक्ष रवींद्र भोईर, महिला शहराध्यक्षा संगीता पाटील, जिल्हा भाजप वाहतूक सेना अध्यक्ष सुधीर घरत, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत, नगरसेवक कौशिक शहा, विनोद साबळे, अविनाश कोळी, चंद्रकांत घरत, बापू घारे, प्रकाश पाटील, सुशीला घरत आदी उपस्थित होते.

या वेळी महेश बालदी यांनी सांगितले, की विकासाच्या मंत्रामुळे विजय झाला आहे. घारापुरीत गेली अनेक वर्षे वीज नव्हती, ते आणण्याचे काम भाजपच्या माध्यमातून केले आहे. तसेच शिवस्मारक उभारण्याचे आश्‍वासन पूर्ण केले. उरणमध्ये कोट्यवधींची कामे करण्यात आली आहेत. उरणमध्ये भाजपचा आमदार झाल्यामुळे शेकापचे स्वप्न भंगले आहे. विकासाचा मूलमंत्र बोलून विकासकामे केली आहेत. उरणपर्यंत रेल्वे येण्यासाठी जे अडथळे होते ते केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून येणाऱ्या दीड वर्षात रेल्वे सेवा सुरू होणार आहे.

रायगडच्या जनतेने योग्य तो माणूस निवडून भाजपला पसंती दिली आहे. भाजप जातीपातीचे राजकारण करीत नसून विकासाच्या परिभाषेतून विजय मिळविते. 
- प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तृत्वशून्य नेत्यांना भोंदूबाबांचा आधार, हे नेते भोंदू; ठाकरेंचा टोमणा कुणाला? पाण्याच्या मुद्द्यावरही बोलले

IPL 2026 Marathi News: विराट कोहलीचा प्रतिस्पर्ध्यांना 'धडकी' भरवणारा Video; भाईचा विषयच हार्ड, षटकाराशिवाय नावच नाही

Bangkok Return Youth Death : बँकॉकहून परतलेल्या तरुणाचा शौचालयाच्या छतावर नग्न अवस्थेत मृतदेह; हातात कंडोमचं पाकीट, झाडावर टांगलेले कपडे, तोंडातून येत होता फेस!

सोन्यामध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची, युद्धामुळे सोन्याचे भाव कमी होणार; तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान

SCROLL FOR NEXT