मुंबई

भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी?, शिंदेंकडून 50 लाखांचा निधी घेत भाजपात प्रवेश

नवी मुंबईतील काही माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत पाठिंबा दिला होता

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबईतील काही माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत पाठिंबा दिला होता

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून त्यांना इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा वाढत चालला आहे. यासंदर्भात नवी मुंबईतील काही माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत पाठिंबा दिला होता. मात्र त्यातील तीन नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. दरम्यान, शिंदे गटातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपचे आमदार नाईक यांच्या या खेळीमुळे नवी मुंबईत शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली असल्याचे बोलले जात आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या माजी नगरसेवकांनी नगरविकास खात्याकडून 50-50 लाख रुपयांचा निधी काही दिवसांपूर्वीच मंजूर करून घेतला होता, असा दावाही शिंदे गटातील नेत्यांनी केला आहे. त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, नवी मुंबईत डिसेंबर 2021 मध्ये भाजप नगरसेवकांची शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रांग लावली होती. त्यावेळी भाजपच्या जवळपास 14 नगरसेवक आणि नगरसेविका शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. यावेळी नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हेदेखील शिवसेनेत दाखल झाले होते. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते. पण, राज्यात सत्तांतर झाले आणि राज्यात शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे तिन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, आज शिंदे व फडणवीसांच्या माध्यमातून युती सरकार आले आहे. असे असताना काही गोष्टी घडू नयेत. नव्या मुंबईचे नेतृत्व जे करतात, ते राजकीयदृष्ट्या परिपक्व आहेत, त्यांनी या गोष्टी करायला नको होते. त्यांचे टायमिंग चुकले, अशी टीका चौगुले यांनी गणेश नाईक यांचे नाव न घेता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान १०० टक्के योग्यच, पण दुसऱ्यांनाही आया असतात; १२ वर्षे तुमच्या लोकांनी केलं त्याची माफी कोण मागणार, राज ठाकरेंचा सवाल

Nashik Municipal Corporation : 'लोकांच्या असंतोषाची परीक्षा पाहू नका, इतिहास आपल्या समोर आहे'; मंत्री छगन भुजबळ यांनी कोणावर साधला निशाणा?

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत मोठा निर्णय! मूळ ढाच्याला बाधा न आणता काम करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे 'पुरातत्त्व'ला निर्देश

Latest Marathi News Live Update : इंग्रज फक्त केसरी आणि द मराठा या वृत्तपत्रांना घाबरायचे : अमित शहा

Bhiwandi Building Collapse: ढिगाऱ्यातही जिवंत राहिली आईची माया, भिवंडी दुर्घटनेतील 'त्या' प्रसंगाने सर्वांचे डोळे पाणावले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT