Ashish Shelar Criticize Shiv Sena esakal
मुंबई

किमान मुंबईकरांचा खिसा तर कापू नका; शेलारांचा शिवसेनेवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळत आहे. खास करुन भाजपकडून शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे. तसंच ईडीचा ससेमिराही सत्ताधाऱ्यांच्या मागं लागल्याचं चित्र आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Muncipal Election) पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहे. आता भाजप नेते आशिष शेलार यांनी महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. (Ashish Shelar Criticize Shiv Sena)

मुंबई महापालिकेतील 'माजी' कारभाऱ्यांनी आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा कोणत्याही प्रकारची कर वाढ नाही अशा फुशारक्या मारल्या. मग, प्रशासक बसताच मालमत्ता करात वाढ कुठून आली? प्रशासकाच्या आडून हे करायचं ठरलं होत का?, असा थेट सवाल शेलार यांनी सत्ताधाऱ्यांना (शिवसेना) उपस्थित केलाय.

महापालिकेवर प्रशासक बसला असला तरी राज्याच्या सत्तेच्या खुर्चीत तुम्हीच बसला आहात ना? असा सवाल करुन शेलार पुढे म्हणाले, कोरोनामुळं मुंबईकरांचं अर्थकारण बिडलंय हे दिसतंय ना? काही मदत करु शकत नाही, तर किमान मुंबईकरांचा खिसा तर कापू नका. आता मुंबईकरांकडून पण ही 'वसुली' करणार का? अशी टीका त्यांनी सत्ताधारी शिवसेनेवर (Shiv Sena) केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT