मुंबई

फडणवीसांचा पुनरुच्चार, विधानसभेत शिवसेनेशी युती ही चूक

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यवस्थात्मक बदल करीत भारताला जगात अग्रेसर करण्याचे कार्य हाती घेतले असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.गरीबकल्याण हा त्यांच्या निर्णयांचा कणा असतो असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजपने आयोजित केलेल्या सेवा सप्ताह व्हर्च्युअल रॅलीत ते बोलत होते.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय नेते व्ही.सतीश, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा तसेच ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यावेळी उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व बालपणापासून विकसित होत गेले असे सांगत फडणवीस म्हणाले, गरीबी त्यांनी बालपणापासून अनुभवली. सैनिक की संन्यासी हे द्वंद्व मनात सुरू असताना त्यांनी स्वयंसेवकत्व स्वीकारले. दिल्लीतील प्रस्थापितांना मोठे आव्हान देण्याचे काम त्यांनी केले. ती व्यवस्था एकतर आमच्यातील व्हा किंवा बाहेर जा, ही सांगणारी होती. पण त्या व्यवस्थेचे भाग न बनता त्यांनी एक नवी व्यवस्था निर्माण केली.

गरीब कल्याणाचा एक मोठा कार्यक्रम मोदी यांनी यांनी हाती घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत योजना, जनधन अशा अनेक योजनांतून त्यांनी अर्थव्यवस्थेत गरिबांना सामावून घेतले आणि भारत ११ व्या क्रमांकावरून जगातील पहिल्या ५ अर्थव्यवस्थेत आला. ही त्यांची दूरदृष्टी आहे

कोरोनाच्या काळात सुद्धा विक्रमी FDI भारतात आला. हा आज जगाचा भारतावर असलेला विश्वास आहे. शेतकरी वर्गासाठी सर्वाधिक कल्याणाच्या योजना मोदींनी राबवल्या आहेत. आता सुद्धा अनेक योजना राबविल्या जात असताना विरोधक  केवळ गैरसमज पसरवत आहेत. संरक्षण क्षेत्रात सुद्धा भारताने मोठी भरारी घेतली आहे. पुलवामा, उरी, डोकलाम, गलवान या सर्व घटना सांगतात हा नवा भारत आहे.

नरेंद्र मोदी हे एक कणखर नेतृत्व आहे. केवळ बोलणारे नाही, तर काम करून दाखविणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात भारताचा  उज्ज्वल काळ आहे. या वेळी भाऊ तोरसेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकला. राज्यभरात मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह राबवला जाणार आहे.

शिवसेनेशी युती ही चूक

पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी आजवर केलेली मोदींविषयीची भाकिते अचूक ठरली असे सांगत फडणवीस म्हणाले ,"भाजप स्वबळावर विधानसभेत लढला तर १५० जागा येतील असे भाकित केले होते. ते ऐकले नाही ही चूक झाली."

( संपादन - सुमित बागुल )

bjp made mistake by doind alliance with shiv sena during vidhansabha election

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT