Atul-Bhatkhalkar
Atul-Bhatkhalkar 
मुंबई

"इतरांना मदत देतानाच मुंबईकरांनाही नुकसान भरपाई द्या"

विराज भागवत

२००५ च्या नुकसानापेक्षा जास्त नुकसान झाले असूनसुद्धा अद्याप पंचनामे नाहीत.

मुंबई: महाराष्ट्रात गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. सुरुवातीला मुंबईत पावसाचे बळी गेले. त्यानंतर महाड, चिपळूण, सांगली, कोल्हापूरातही पावसाने थैमान घातले. या झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत करताना मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका. तसं झालं तर मुंबई भाजपा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांना आणि महाविकास आघाडीला दिला.

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना विनानिकष मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, परंतु ही मदत करताना मुंबईतील नुकसानग्रस्त नागरिकांना विसरू नका, मुंबईतील नुकसानग्रस्तांना सुद्धा विनानिकष भरीव मदत करावी अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झोपडपट्टी, चाळीत राहणारे नागरिक, छोटे दुकानदार, मध्यम वर्गीय यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. चेंबूर, मुलुंड या ठिकाणी दरड कोसळून ४० पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले. हनुमाननगर, पोयसर, दिंडोशी, गोवंडी, निबारपाडा, विक्रोळी या परिसरात शेकडो घरे जमीनदोस्त झाली, हजारो घरांमध्ये पाणी जाऊन घरगुती साहित्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठाकूर कॉम्प्लेक्ससह अनेक ठिकाणी पाणी साचून हजारो ऑटोरिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे", अशी माहिती त्यांनी दिली.

"२००५ साली झालेल्या नुकसानापेक्षा अधिकचे नुकसान झाले असूनसुद्धा अद्याप साधे नजर पंचनामे सुद्धा करण्यात आलेले नाहीत. सरकारी अधिकारी फक्त खावटी अनुदान देऊ असे संतापजनक उत्तर देत आहेत. बेसुमार पावसामुळे नुकसान झालेल्या असलेल्या मुंबईकरांना आता तरी मदत करावी, अन्यथा मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठे जनआंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा आ. भातखळकर यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT