मुंबई

बदलापुरात भाजपचे 'मिशन 30' 

सकाळ वृत्तसेवा

बदलापूर  : येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या बदलापूर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती होईल का नाही, हे आताच सांगता येणार नाही. मात्र युतीबाबत काही प्रस्ताव असेल तर तो शिवसेनेने द्यावा. कार्यकर्त्यांनी युती होईल की नाही याचा विचार न करता येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी आणि आपल्या पक्षासाठी देऊन संपूर्ण ताकदीनिशी कामाला लागण्याचे आदेश खासदार कपिल पाटील यांनी दिले. एकूणच खासदार कपिल पाटील यांनी दिलेल्या आदेशामुळे शिवसेना-भाजप युती होण्याची शक्‍यता धूसर असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपचे पालिका निवडणुकीत "मिशन 30' असल्याचे पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडताना सांगितले. 

बदलापूर शहर मंडळ अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक संजय भोईर यांची वर्णी लागल्याने बदलापूरातील काटदरे मंगल कार्यालयात भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार कपिल पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी नगरपालिका निवडणुकांत संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या शिवसेना-भाजप युतीत झाल्या होत्या. मात्र राज्य विधानसभेच्या सत्ता स्थापनेमुळे शिवसेना-भाजप युती तुटल्याने नगरपालिकेमध्ये युती होणार का? याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

मात्र कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता कामाला लागावे आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे खासदार कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रदेश पातळीवर सर्व्हे झाल्यानंतर उमेदवारी देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांनी आपले काम जोमाने करण्याचे आदेश खासदार पाटील यांनी यावेळी दिले.

या मेळाव्याला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे, मावळते शहराध्यक्ष संभाजी शिंदे, भाजप जिल्हासरचिटणीस शरद म्हात्रे, माजी नगराध्यक्ष राम पातकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा प्रणिता कुलकर्णी, नगरसेवक प्रशांत कुलकर्णी आदींची भाषणे झाली. मिलिंद धारवाडकर यांनी सूत्रसंचालन, शहर अध्यक्ष संजय भोईर यांनी स्वागत केले. निवडणुकीच्या तोंडावर हा कार्यकर्ता मेळावा असल्याने अनेक कार्यकर्ते ढोल-ताशा पथक व आपल्या समर्थकांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यकर्त्यांच्या पाठीशी : कथोरे 
आमदार किसन कथोरे यांनी स्थानिक मुद्द्यांना हात घालत येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावण्याचे आश्वासन देत बदलापूर नगर परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन केले. भाजपाचे नवनियुक्त शहराध्यक्ष संजय भोईर यांनी या कार्यकर्ता मेळाव्यात बदलापूर शहरासाठी एक जम्बो कार्यकारणी जाहीर केली. मागील निवडणुकीत युती नसताना थोडक्‍यात सत्ता गेली हे लक्षात घेऊन येत्या निवडणुकीत सर्वानी दक्ष राहून 47 सदस्यांच्या सभागृहात भाजपचे "मिशन 30" लक्ष ठेवण्याचे स्थानिक नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs ENG, T20 WC: अनपेक्षित निकाल! श्रीलंकन ढेपाळले, इंग्लडचा Super 8 मध्ये एकतर्फा विजय; पाकड्यांच्या मनात घबराट...

Buldhana Shivaji Maharaj Statue Row : चिखला गावचे फरार सरपंच Ganesh Kakad कोण? पहिल्यांदाच समोर येत व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

Shikhar Dhawan चं दुसरं लग्न; रोहित शर्मा, चहलची उपस्थिती, तर विराट-रहाणेच्या कमेंटने वेधले लक्ष

SL vs ENG, T20 WC: W,W,W,W,W ! श्रीलंकेचा निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटू विल जॅक्सने वाढवली डोकेदुखी

Pune News: रुग्णांच्या जिवाशी खेळ, निकृष्ट औषधे वितरित; थेरगाव रुग्णालयातील प्रकार, तब्बल १६ हजार गोळ्यांची बॅच परत, चौकशीचे आदेश!

SCROLL FOR NEXT