ajit pawar esakal
मुंबई

BKC MVA Rally: मुंबईचं मराठीपण बाळासाहेबांमुळं टिकलं पण...; अजित पवारांनी घेतला समाचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभाराचेही अजित पवारांनी यावेळी वाभाडे काढले

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाविकास आघाडीची तिसरी सभा मुंबईतल्या बीकेसीच्या मैदानावर सुरु आहे. यामध्ये विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईचं मराठीपण बाळासाहेब ठाकरेंमुळं टिकलं पण हे काहींना सहन झालं नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. (BKC MVA Rally Mumbai Marathi survived thanks to Balasaheb Thackeray says Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले, मुंबईचं मराठीपण टिकवण्यात आणि मुंबईचा मानसन्मान कानाकोपऱ्यात वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली, शिवसेनेमुळं मुंबई टिकली. मुंबईत मराठी माणसाचा अभिमान, स्वाभिमान कायम राहिला. मराठी माणूस एकजूट करुन राहिला, हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. हेच नेमकं काहींच्या डोळ्यावर यायला लागलं.

यामुळं काही जणांना फोडण्याचं राजकारणं झालं. यामुळं संविधान, कायदा योग्य स्थितीत राहणार आहे का? याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. कोणत्याही निवडणुका असोत मविआनं चांगल्या पद्धतीनं यश मिळवलं आहे. जनता आपल्या बाजूनं आहे, त्यामुळं आपण सर्वांनी एकत्र येत या सर्वांशी मुकाबला करण्याची गरज आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा मविआचं सरकार स्थापन झालं तेव्हा अडचणी अनेक होत्या. कोरोनाचा काळ होता पण आम्ही चांगल्याप्रकारे राज्य चालवलं. आर्थिक शिस्त बिघडू दिली नाही. आता ३१ मार्चची १ लाख ८ हजार कोटींची बिलं द्यायचं या सरकारनं थांबवलं आहे. कशामुळं हे घडलं कोण आला जबाबदार आहे? सर्वसामान्यांचं सरकारचे मुख्यमंत्री याला जबाबदार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT