mask 
मुंबई

मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार, कोट्यवधीचा माल जप्त

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या थैमानात जीवनावश्यक वस्तू झालेले मास्क आणि सॅनिटायझर यांचा काळा बाजार सुरूच आहे. शिधावाटप नियंत्रण विभागाने सुमारे दोन कोटी रुपयांचे 41 लाखांहून अधिक मास्क आणि 98 हजारांहून अधिक सॅनिटायझरच्या बाटल्यांचा बेकायदा साठा जप्त केला. विलेपार्ले परिसरातून तब्बल एक कोटी 41 लाख रुपयांचे मास्क जप्त करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे. त्यानुसार 21 ठिकाणी कारवाई करुन हा बेकायदा साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती शिधावाटप नियंत्रक कैलास पगारे यांनी दिली. जप्त केलेल्या वस्तूंची सरकारने ठरवलेल्या दरांत वैद्यकीय संस्थांना विक्री केली जाते, असे त्यांनी सांगितले.आतापर्यंत सुमारे एक कोटी 92 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

आग्रीपाडा भागात पाच ठिकाणे कारवाई करून सुमारे 45 लाख रुपयांचे एक लाख 60 हजार मास्क जप्त करण्यात आले. विलेपार्ले परिसरात एकाच छाप्यात एक कोटी 41 लाख रुपयांचे 25 लाख 41 हजार मास्क जप्त करण्यात आले. शिवाजीनगर येथून दोन ट्रकसह 7 लाख 46 हजार रुपयांचे तीन लाख 87 हजार मास्क आणि सांताक्रूझ येथून तीन लाख 58 हजार रुपयांचे एक लाख 79 हजार मास्क जप्त करण्यात आले.
 

 Black market of masks and sanitizers, seizure of crores of goods

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govind Pansare : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे कोण होते? आता का चर्चेत आले?

IPL 2026 : सात पैकी पाच सामन्यात पराभव, तरीही मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये जाणार? कसं असेल समीकरण...

Latest Marathi News Live : सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा कट उधळला, नऊ संशयित महिलांना आरपीएफ पोलिसांकडून अटक

'बहिण गर्भवती असताना त्यांनी...' अन्नू कपूरने सांगितलं ओम पुरी यांचं सत्य, म्हणाले...'माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद केलं'

Ancient Shiva Temple : 600 वर्षांपूर्वीचे शौर्य दगडात जिवंत! बारा ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात मध्ययुगीन कीर्तिमुख शिल्प, सतीगळाचा शोध; काय आहे रहस्य?

SCROLL FOR NEXT