bmc action against 133 Municipal unauthorized pipe connections water mumbai sakal
मुंबई

Mumbai News : पालिका प्रशासनास आली जाग; 133 अनधिकृत नळजोडण्यांवर पालिकेची कारवाई

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या डोंबिवलीतील दौऱ्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या डोंबिवलीतील दौऱ्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई करण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.

दिवसभरात 133 अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई केली आहे. तसेच ह प्रभागातील ट्युलिप या इमारतीवर अनधिकृत नळ जोडणी केल्याप्रकरणी पालिका प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली शहरात अनधिकृत बांधकामांचे जाळे मोठ्या प्रमाणात असून या बांधकामांना पाणी पुरवठा देखील अनधिकृत रित्या केला जात आहे. यामुळे पाण्याचा कोठा वाढवूनही अनेक भागात पाण्याची समस्या ही बारा ही महिने कायम असल्याचे दिसून आले आहे.

काही दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री सामंत यांनी डोंबिवलीत धाड टाकत पाणी चोरी होत असल्याची बाब उघडकीस आणली. परंतू त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी त्या भागाची पाहणी करत पाणी चोरी झाले नसल्याचे स्पष्ट केले.

या घडलेल्या प्रकारामुळे उद्योगमंत्र्यांचा दौरा तसेच पालिका अधिकाऱ्यांची तपासणी या दोन्ही बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामुळे जाग आलेल्या पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे.

गुरुवारी दिवसभरात विविध प्रभागातील सुमारे 133 अनधिकृत नळजोडण्या पालिका प्रशासनाकडून खंडीत करण्यात आल्या. अ प्रभागातील बल्याणी परिसरातील 17 नळजोडण्या, ब प्रभागातील उंबर्डे परिसरातील 5, क प्रभागातील देवानंद भोईर चाळ, चंदनशिवेनगर परिसरातील 21,

जे प्रभागातील अशोकनगर, वालधुनी परिसरातील 13, ड प्रभागातील काटेमानिवली येथील 10, फ प्रभागातील खंबाळपाडा, कांचनगाव परिसरातील 12, ग प्रभागातील नेरुरकर रोड, म्हात्रे नगर, आयरेगाव येथील 12, आय प्रभागातील गोळवली, पिसवली या परिसरातील 22, ह प्रभागातील 15, ई प्रभागातील नांदिवली,

भोपर व देसलेपाडा परिसरातील 6 अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ह प्रभागातील ट्युलिप इमारतीवर अनधिकृत नळजोडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आय प्रभागातील 14 वाणिज्य आस्थापने यांवर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

Malegaon News : आता अवघ्या महाराष्ट्रात राबवणार 'मालेगाव शैक्षणिक पॅटर्न'; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT