Delta plus virus sakal media
मुंबई

जिनोम सिक्वेन्सिंगसाठी खासगी रुग्णालयांकडून नमुने; महापालिकेपुढे मोठे आव्हान?

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबई महापालिकेसमोर (bmc) आता डेल्टाप्लस या नवीन कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटचा (delta plus variant) धोका आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेने मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba hospital) जिनोम सिक्वेसिंग (genome sequencing) सुरू केले आहे. त्यात पहिल्या जिनोमिक सिक्वेसिंगसाठी घेतलेल्या पहिल्या नमुन्यांमध्ये जवळपास 70 टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग आढळून आला आहे.

पहिल्या फेरीत मुंबई महापालिकेने एकूण 188 नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी घेतले होते. त्यातीस 128 रुग्ण हे डेल्टा पहिल्या कोविड विषाणूने बाधित असल्याचे समोर आले होते. जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पालिकेला एका वेळेस 384 नमुन्यांची गरज असते. पण, तेवढे नमुने गोळा करणे पालिकेला कठीण जात असून आता खासगी रुग्णालयाकडून नमुने घेत आहे.

डेल्टा व्हेरिएंट हा विदर्भात पहिल्यांदा आढळला होता. हाच व्हेरिएंट भारतात दुसरी लाट आणण्यास कारणीभूत ठरला असून आताही लंडन आणि अमेरिकेत तिसरी लाट येण्याचे कारण आहे. दरम्यान, पालिकेला जिनोमिक सिक्वेसिंगसाठी 384 नमुने गोळा करणे गरजेचे  आहे. पण, दुसऱ्या लाटेचा कहर कमी झाल्याने पालिकेने फक्त 188 नमुने गोळा केले. हे सर्व नमुने पालिकेच्या रुग्णालयांमधून घेण्यात आले होते. पण, आता यापुढे पालिका खासगी रुग्णालयाकडूनही नमुने गोळा करणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

सध्या पालिका डेल्टा व्हेरिएंट रुग्णासाठी किती घातक आहे यावर अभ्यास करत आहे. त्यानुसार, पालिकेला उपचार पद्धती आणि होम क्वारंटाईन, बेड्सची व्यवस्था करण्यास मदत होईल असे ही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

"जिनोम सिक्वेसिंगसाठी पालिकेला नमुने पाठवले जातील. मात्र, यासंबंधित अद्याप विचारणा झालेली नाही. कारण, जिनोम सिक्वेसिंगसाठी 384 नमुन्यांची गरज आहे. त्यासाठी खासगीतील नमुने पाठवले तर ही प्रक्रिया आणखी सोपी होईल."  

डॉ. गौतम भन्साळी , प्रभारी, खासगी कोविड रुग्णालये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : कोबरा नाग गळ्यात घालून स्टंट करणे ठरले जीवघेणे, तीन वेळा डसला अन्... काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Upcoming Job 2026: जॉब सीकर्ससाठी खुशखबर! जानेवारीत सेना, DRDO आणि पोस्ट ऑफिसमध्ये संधी

AC Local: हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; एसी लोकल अखेर धावणार, पण कधीपासून?

Sangli Airport : कवलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी; सांगलीच्या विकासाला मिळणार नवे पंख, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

BMC Election 2026: महापालिका निवडणुकीचा वाहतुकीवर परिणाम! हजाराहून अधिक बस करणार इलेक्शन ड्युटी; प्रवासी सेवा कोलमडणार

SCROLL FOR NEXT