Akhilesh Yadav, Aditya Thackeray and Tejaswi Yadav 
मुंबई

BMC Election: शिवसेनेचा मुंबईसाठी 'मेगा प्लॅन'! अखिलेश-तेजस्वी पुरवणार रसद?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची दोन गटात विभागणी झाली आहे. आता बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन गट झाले आहेत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना सत्तेत आहे. तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सेना संघर्ष करत आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधकांकडून पाठबळ मिळत असल्याचं चित्र आहे. (BMC Election news in Marathi)

मुंबईतील विधान सभेच्या अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी शिवसेना आणि भाजप आमने-सामने आहे. शिंदे गटाचा स्पष्टच भाजपला पाठिंबा आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेला कायम विरोध करणाऱ्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिनाने पाठिंबा दिला आहे. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपल्याला उद्धव ठाकरेंनी मांडलेली हिंदुत्वाची व्याख्या मान्य असल्याचं म्हटलं आहे. एकंदरीतच उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा वाढत आहे.

शिवसेना आणि भाजपसाठी आगामी पोटनिवडणूक मुंबई महापालिकेची रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळे सहाजिकच दोन्ही गटांकडून जोर लावण्यात येत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना मिळत असलेला पाठिंबा पाहता, त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आगेकूच करताना दिसत आहे. राष्ट्रीय पातळीवरील पक्षांकडून उद्धव ठाकरे यांना पाठिंबाही दर्शविण्यात येत आहे.

दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या सभांचे मुंबई आयोजन करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची मांडलेली भूमिका इतर राष्ट्रीय पक्षांना रुचत असल्याचं चित्र आहे. मात्र त्याला किती यश मिळतं हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT