BMC election Uddhav Thackeray Shiv sena aditya Thackeray BJP Eknath Shinde BMC election Uddhav Thackeray Shiv sena aditya Thackeray BJP Eknath Shinde
मुंबई

बीएमसी निवडणूक : उद्धव सेना आपला बालेकिल्ला राखणार?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारे आमदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदारही आहेत. यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणी वाढल्या आहे. अशात बीएमसीची निवडणूक (अद्याप घोषणा झालेली नाही) होऊ घातली आहे. बीएमसी ही शिवसेनेचा (Shiv sena) बालेकिल्ला राहिला आहे. एकनाथ शिंदेंमुळे आता खरी शिवसेना कोणती असा प्रश्नही चर्चेला जात आहे. तेव्हा उद्धव ठाकरे पुनरागमन करू शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती करून महाराष्ट्राची धुरा आपल्या हाती घेतली आहे. यानंतर विशेष अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना सलग दोन धक्के दिले. यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांचे सर्व काही संपल्याचे राजकीय पंडितांचे म्हणणे आहे. अशात बृहमुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) निवडणुका (BMC election) काही महिन्यांनी होऊ घातल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास केल्यास उद्धव (Uddhav Thackeray) सेना बॅकफूटवर आल्याची दिसत आहे. यामुळेच बीएमसी निवडणुकीत शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे अनेक दिवसांपासून आजारी आहे. दुसरीकडे नवे व्हीप प्रमुख भरत गोगावले यांनी विश्वासदर्शक ठरावाचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना (आदित्य ठाकरे वगळून) अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली होती. यामुळे आमदारांचे काय होणार असाही प्रश्न आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मागच्या बीएमसी निवडणुकीपूर्वी स्वतंत्रपणे लढली होती. अशा स्थितीत यावेळी शिवसेना एकटी लढवून पुनरागमनाची खात्री बाळगू शकेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षांतराचा शिवसेना पक्ष किंवा त्यांच्या नगरसेवकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही.

उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांचा मोठा पाठिंबा

बंडखोरी सुरू झाल्यापासून उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. शिंदे गटाची बंडखोरी झाल्यापासून उद्धव यांनी कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत अनेकवेळा बैठका घेतल्या. उद्धव ठाकरे शिवसेनेला एकत्र करण्याचे काम करीत असल्याचे दिसून आहे. आता त्यांना कोणत्याही परिस्थितीत शिवसेना (Shiv sena) फुटू द्यायची नाही.

कोरोना काळातील कामे येणार कामी?

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात चांगले काम केले. कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने लसीकरणापासून ते रुग्णालयांमध्ये उत्तम व्यवस्था करण्यावर भर दिला. याचा त्यांना बीएमसी निवडणुकीत फायदा होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो प्रकल्प रद्द केला होता. आरेतील मेट्रो कारशेडची जमीन रद्द करण्याच्या निर्णयात माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग होता. आता त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आरेमध्ये कारशेड बांधण्याची घोषणा केली. याचा उद्धव ठाकरे यांना फायदा होईल का? हेच येणारा दिवसांत स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT