मुंबई

कोरोनासंदर्भात न्यूयॉर्कमध्ये पडलेला प्रश्न मुंबईतही पडलाय, खरंच मुंबई न्यूयॉर्कच्या पावलांवर चालतेय का?

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 23 - मुंबईत कोरोनाचे रुग्ण आणि मृतांची संख्या वाढत आहे. मृतदेह वाढल्यामुळे त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी स्मशानभूमी अपुऱ्या पडत आहेत. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका प्रशासनाकडून नव्या पर्यायांचा शोध सुरू आहे. 

कोरोना झपाट्याने मुबईत पसरत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढ असताना मृतांची संख्याही वाढत आहे. मुंबईतील विद्युतदाहिन्यांमध्ये कोरोनाच्या मृतदेहांची संख्याही वाढत आहे. विद्युत दाहिन्या अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता मृतदेहांच्या दफनभूमीसाठी मोठ्या जागेचा शोध सुरू असल्याचे आरोग्य खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

31 मे पर्यंत रुगणांचे प्रमाण आणि मृतांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र संख्याही वाढत राहिली तर दफनभूमीसाठी नव्या जागेचा पर्याय शोधावा लागेल. असेही त्यांनी सांगितले. परदेशात मृतांची संख्या वाढू लागल्याने त्यांच्यासाठी मोठ्या दफनभूमी तयार करण्यात आल्या. त्यात शेकडो मृतदेह दफन केले जात आहेत. त्या धर्तीवर मुंबईत किंवा मुंबईच्या बाहेर जागेचा शोध सुरू असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. 

मुंबईत रोज नव्या 40 हुन अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आतापर्यंत मुंबईतील कोरोनाचा बाधितांची संख्या 25 हजाराहून अधिक झाली आहे. तर मृतांची संख्या 882 वर पोचली आहे. दररोज 1300 ते 1400 कोरोनाचा बाधितांची वाढ होत आहे. तर 750 हुन अधिक संशयित रुगणांची भर पडत आहे. 
 
कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या आरोग्य खात्यापुढे चिंतेची बाब ठरली आहे. आता समशानभूमीमध्ये दररोज येणाऱ्या मृतांच्या संख्येतही वाढ होत असल्याने त्यांची तातडीने विल्हेवाट कशी लावायची याचा विचार आरोग्य खात्याचे अधिकारी करू लागले आहेत. मुंबईतील स्मशानभूमीमध्ये प्रेतांचा खच पडू लागल्याने दिसून येत आहे. 

मृतदेहांचा सर्वाधिक भार चंदनवाडी, दादर, वरळी स्मशानभूमीतील विद्युत दाहिन्यांवर पडत आहे. या समशानभूमीत प्रत्येकी दररोज 15 हुन अधिक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. त्यांच्यावर दिवसरात्र अंत्यसंस्कार केले जात आहेत.  तीन पाळयांमध्ये 9 कामगार काम करणाऱ्या कामागारांच्याही आता हे काम आवाक्याबाहेर गेले आहे. अलीकडे मृतदेहांची संख्या वाढू लागल्याने या कर्मचाऱयांवर अंत्यसंस्काराच्या कामाचा मोठा ताण पडू लागला आहे. 

समशानभूमीत खड्डे खोडणाऱ्या कामगारांनी कोरोनाच्या भीतीने स्थलांतर केले असल्याने खड्डे खोदण्यासाठी कामगार मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.

bmc is facing problem while getting rid of covid patients bodies is mumbai walking on New Yorks path

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT