मुंबई

"मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा साडे सहा लाखांवर जाणार", यावर BMC म्हणतेय...  

सकाळवृत्तसेवा

'बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'करोना कोविड १९' च्या रुग्णांची आकडेवारी ही मे महिन्याच्या मध्यापर्यंत काही लाखांमध्ये पोहोचेल' अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून केंद्रीय चमूच्या हवाल्याने प्रकाशित झाल्या आहेत. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे स्पष्ट खुलासा करण्यात आलाय. 

केंद्रीय चमूने आपल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान महापालिका आयुक्त यांच्यासह महापालिकेतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील परिस्थिती आणि त्या अनुषंगाने महापालिका करीत असलेल्या उपाययोजना याविषयीची माहिती घेतली. संबंधित केंद्रीय चमूने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक व वैद्यकीय उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केलेले आहे.

त्याचबरोबर विविध माध्यमांमध्ये ज्या प्रकारची अतिरंजित माहिती प्रकाशित झाली आहे, तशा प्रकारचे कोणतेही प्रत्यक्ष वा सूचक वक्तव्य सदरहू चमूने  महापालिका आयुक्तांकडे किंवा अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे अथवा इतर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केले नाही. याउलट वर उल्लेख केल्यानुसार त्यांनी महापालिकेच्या प्रयत्नांचे सकारात्मकरित्या कौतुकच केले. असं सांगण्यात आलंय. 

८०% पेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती स्थिर
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'करोना कोविड १९' विषयक आकडेवारी लक्षात घेता, दिनांक ११ मार्च ते २१ मार्च २०२० यादरम्यान बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ३ हजार ४४५ व्यक्तींना या रोगाची बाधा झालेली असून यापैकी ४२५ पेक्षा अधिक रुग्ण आजवर बरे होऊन घरी गेले आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधोपचार करण्यात आले, ही बाब या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यायला हवी. तसेच २ हजार ८८२ रुग्ण सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून यापैकी ८०% पेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती स्थिर आहे व त्यांना धोका नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आकडेवारी लक्षात घेतल्यास 'कोरोना कोविड १९' या आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण व वाढीचे प्रमाण आटोक्यात आहे. केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आवश्यक ती सर्व कार्यवाही काटेकोरपणे अमलात आणली जात आहे. ज्यामुळे संसर्गास प्रतिबंध होण्यास देखील मोठी मदत होत आहे. चबरोबर नागरिकांनाही आवाहन करण्यात येते की, त्यांनी केंद्र शासन, राज्य शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात आणि 'कोरोना कोविड १९' विरोधात सुरू असलेल्या लढाईला बळ द्यावे.

BMC gives their clarification on exponential growth in covid 19 patients in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT