BMC-1200. 
मुंबई

'मॅनहोलमध्ये वाहून गेल्यास तुम्हीच जबाबदार'; महापालिकेने लावला 'त्या' ठिकाणी सूचना फलक...

ऋषिराज तायडे

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत दरवर्षी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. त्याचा निचरा करण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जातात. मॅनहोलचे झाकणे उघडणे, पम्पिंग मशीनच्या साह्याने पाण्याचा उपसा करणे, आदी उपाय केले जातात. मात्र, काही वेळा पालिकेचे पथक येण्यापूर्वी काही उत्साही नागरिक स्वतःहून मॅनहोल उघडतात. अशावेळी अपघात होऊन एखादा व्यक्ती मॅनहोलमध्ये पडून वाहून जातो. याप्रकारच्या घटना मुंबईत दरवर्षीच घडतात.

गेल्यावर्षी गोरेगाव पूर्वेच्या भारतभाई चाळीतील रहिवासी असलेल्या दिव्यांश सिंग हा चिमुरडा उघड्या नाल्यात पडून वाहून गेला होता. आता त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आला आहे. मात्र, पालिकेकडून उघडे नाले, मॅनहोल बंद करण्याबाबत पुढाकार घेण्याएवजी पालिकेने अजब कारवाई केली आहे. ज्याठिकाणी गतवर्षी दिव्यांश नाल्यात पडला होता, अगदी त्याच ठिकाणी पालिकेने सूचना फलक लावला आहे. त्यावरील मजकूर वाचून पालिका आपली जबाबदारी झटकत असल्याचे समोर येत आहे.

''गोरेगाव परिसरातील नाल्याच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सूचित करण्यात येते की अतिमुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर येऊन धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी घरातील लहान मुले, अंध व्यक्तींबाबत दक्षता घ्यावी. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही,'' अशा आशयाचे सूचना फलक महापालिकेने लावले आहे.  

याप्रकाराबाबत परिसरातील नागरिकांनी कमालीचा रोष व्यक्त केला आहे. मृत दिव्यांशचे वडील सूरजभान सिंग म्हणाले की, पालिकेने लावलेले सूचना फलक म्हणजे आम्ही मुद्दाम नाल्यात पडावे, असे वाटते. या प्रकारचे सूचना फलक लावताना पालिकेला लाज नाही वाटली. सूचना फलक लावण्यापेक्षा पालिकेने उघडे नाले, मॅनहोल बंद केले असते तर बरे झाले असते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT