bmc
bmc 
मुंबई

कोरोनाच्या संकटात महापालिकेपुढे नवी चिंता; कसा काढणार यातून मार्ग? वाचा सविस्तर...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता परदेशातून तसेच परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर महापालिकेने लक्ष ठेवणास सुरुवात केली आहे. यात परदेशातून आलेल्या प्रवाशांना काही दिवस हॉटेल मध्ये क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. तसेच परराज्यातून आलेल्या प्रवाशांनाही होम क्वारंटाईन सक्तीचे आहे. मात्र, आता स्थलांतरीत कामगारही परतू लागल्याने त्यांच्या क्वारंटाईनबाबत महापालिकेची चिंता वाढली आहे. 

विदेशातून किंवा बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी ही केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार आणि मेडिकल प्रोटोकॉलनुसार काटेकोरपणे करवून घेण्यात येत आहे. तसेच याबाबत आवश्यक त्या प्रकरणी संबंधित व्यक्तींचे परिणामकारक विलगीकरण करण्याच्या दृष्टीने हॉटेल, लॉजेस इत्यादींच्या स्तरावर समन्वय साधून आवश्यक ती व्यवस्थाही सातत्याने करण्यात येत आहे. त्याचबरोबर मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचीही वैद्यकीय तपासणी सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार करण्यात येत आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. 

सकाळ IMPACT: आच्छाड तपासणी नाका प्रकरणात चौकशीचे आदेश; परिवहन विभागात मोठी खळबळ...

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावे लागत आहे. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहाणे बंधनकारक आहे. मुंबई परिसरात आतापर्यंत 60 हजार स्थालांतरीत कामगार परत आल्याचा अंदाज आहे आणि ते सातत्याने येतही आहे.

हे कामगार प्रामुख्याने भाड्याच्या घरात अथवा कामाच्या ठिकाणी राहतात. त्यामुळे त्यांच्या 14 दिवसांच्या क्वारंटाईनचा मोठा प्रश्न आहे. मुंबईतील कोरोनाचे संक्रमण काही भागात अपेक्षितपणे नियंत्रणात आलेले नाही. त्यामुळे आता पालिकेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT